NDA Parliamentary Meeting : एनडीए ही सर्वात यशस्वी आघाडी राहिल्याचे मी अभिमानाने सांगू इच्छितो. एनडीएने ३० वर्षात पाच-पाच वर्षांचे तीन टर्म पूर्ण केल्या आहेत. एनडीए आता चौथ्या टर्ममध्ये प्रवेश करत आहे, असे विधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या सेंट्रल हॉलमधील खासदारांच्या बैठकीत केले. सत्ता स्थापनेपूर्वी एनडीएतील घटक पक्षांचे प्रमुख आणि निवडून आलेल्या खासदारांच्या बैठकीला संबोधित करत असताना मोदी यांनी मागच्या दहा वर्षांच्या कामाचा आढावा घेतला. तसेच पुढे किती वर्ष एनडीए एकत्र सत्तेत राहणार याचीही माहिती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “केवळ सत्ता प्राप्त करणे किंवा सरकार चालविण्यासाठी एकत्र आलेला आमचा गट नाही. राष्ट्र प्रथम या मूळ भावनेतून एनडीएचा समूह एकत्र आला आहे. ३० वर्षांच्या या मोठ्या कार्यकाळात एनडीए एक नैसर्गिक आघाडी म्हणून पुढे आली आहे. अटल बिहार वाजपेयी, प्रकाशसिंग बादल, बाळासाहेब ठाकरे, जॉर्ज फर्नांडिस, शरद यादव असे असंख्य नावे यानिमित्ताने घेता येतील. या लोकांनी जे बी पेरले, त्याला आज जनतेच्या सिंचनातून वटवृक्ष करण्यात आम्हाला यश आले आहे.”

maharashtra vidhan sabha election 2024 uncle dharmarao baba atram vs nephew ambrishrao atram in aheri assembly constituency gadchiroli print politics news
अहेरीत आत्राम काका-पुतण्यात थेट लढत? अपक्षांमुळे प्रस्थापितांच्या मनात धाकधूक…
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
navi Mumbai Narendra modi
महायुतीची मतपेरणी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभेत विकास प्रकल्पांवर भाष्य
Narendra Modi Slams Uddhav Thackeray
Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टोला, “राहुल गांधी ज्या दिवशी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणतील तेव्हा…”
Narendra Modi Kharghar, Narendra Modi latest news,
पंतप्रधानांच्या आगमनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत सरकारची स्वच्छ खारघर मोहीम सुरूच
ubt mla vaibhav naik face nilesh rane kudal in assembly constituency
लक्षवेधी लढत : कुडाळमध्ये राणेंच्या वर्चस्वाचा कस
Ajit pawar on NCP BJP Alliance
Gautam Adani BJP-NCP Alliance Talks : “राष्ट्रवादी-भाजपाच्या युतीच्या बैठकीत गौतम अदाणीही होते”, अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले…

नरेंद्र मोदींचं वक्तव्य “एनडीए इतकं यश कुणालाच मिळालेलं नाही, सरकार चालवण्यासाठी बहुमत हवं, पण…”

एनडीए सरकार किती वर्ष काम करणार?

“आमच्याकडे महान नेत्यांचा वारसा आहे. याचा आम्हाला गर्व वाटतो. मागच्या १० वर्षांत आम्ही या वारशाला घेऊन देशाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. एनडीएच्या सर्व घटक पक्षांत गुड गव्हर्नंस हा समान धागा दिसतो. सर्वच नेत्यांनी आपापल्या काळात, राज्यात गुड गव्हर्नंस देण्याचा प्रयत्न केला. मागच्या दहा वर्षांत देशाच्या जनतेने गुड गव्हर्नंस पाहण्याचा अनुभव घेतला आहे. येणाऱ्या दहा वर्षांच्या काळात मी अत्यंत जबाबदारीने बोलतो आहे. येणाऱ्या दहा वर्षांमध्ये गुड गव्हर्नन्स, विकास, लोकांचं आयुष्यमानाचा दर्जा वाढवणं यावर काम करणार आहोत”, असे सांगून पुढील दहा वर्षांत एनडीएचे सरकार असणार असे नरेंद्र मोदी यांनी सूचित केले.

एनडीएमध्ये माझ्यासाठी सर्व समान

एनडीएबाबत बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, संसदेत एनडीएचा कोणत्याही पक्षाचा कुणीही खासदार असला तरी तो माझ्यासाठी समानच असेल. सत्ता स्थापनेनंतर संसदेत आणि बाहेरही माझ्यासाठी सर्व समानच आहेत. एनडीएमध्ये आपला आणि परका कुणी नाही. यामुळेच आम्ही जनतेचा विश्वास जिंकू शकतो. एनडीएतील घटक पक्षांनी कमी तिथे आम्ही, अशा पद्धतीने काम केले. त्यामुळेच आम्हाला यश मिळू शकले.