नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त बुधवारी ‘सदैव अटल’ या स्मृतिस्थळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनीच नव्हे, तर ‘एनडीए’तील घटक पक्षांतील नेत्यांनीही आदरांजली वाहिली. स्मृतिस्थळावरील ‘एनडीए’तील भाजपेतर पक्षनेत्यांच्या उपस्थितीकडे लक्ष वेधले गेले.

आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी भाजपने ‘एनडीए’ आघाडी अधिक मजबूत करण्यासाठी जाणीवपूर्वक पावले उचलली जात आहेत. वाजपेयींच्या काळात स्थापन झालेल्या ‘एनडीए’ने विरोधकांच्या महाआघाडीप्रमाणे तडजोड केली नसल्याचे मोदींनी ‘एनडीए’च्या गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीत सांगितले होते. वाजपेयींच्या पुण्यतिथीनिमित्त स्मृतिस्थळावरील या नेत्यांच्या उपस्थितीमुळे ‘एनडीए’मध्ये अधिक समन्वय घडवून आणला जात असल्याचे स्पष्ट झाले. वाजपेयींच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ‘एनडीए’तील घटक पक्षांच्या नेत्यांना पहिल्यांदाच आमंत्रित करण्यात आले होते.

Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Bags Of Rahul Gandhi Checked At Amravati.
Rahul Gandhi: कुणालाच सुट्टी नाही! निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासल्या राहुल गांधींच्याही बॅगा; पाहा व्हिडिओ
priyanka Gandhi
Priyanka Gandhi : भावाला दिलेलं चॅलेंज बहिणीने पूर्ण केलं; बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत प्रियांका गांधींचं मोदी-शाहांना प्रतिआव्हान
Kal ho naa ho
“तिथे उपस्थित असलेल्या…”, ‘त्या’ सिनेमातील शाहरुख खानच्या मृत्यूच्या सीनबद्दल अभिनेत्रीचा मोठा खुलासा
Pune Prime Minister Narendra Modi Pandit Jawaharlal Nehru Pune print news
पुणे आवडे पंतप्रधानांना!
Narendra Modi, Narendra Modi Pune,
पुणे : मोदींच्या सभेसाठी भाजपसह महायुतीसमोर ‘हे’ आव्हान! स. प महाविद्यालयाच्या मैदानावर मंगळवारी होणार सभा

‘एनडीए’मध्ये नुकतेच सामील झालेले राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीर अजित पवार गटातील खासदार प्रफुल पटेल, पुन्हा ‘एनडीए’मध्ये आलेले बिहारमधील हिंदूस्थानी आवाम मोर्चाचे प्रमुख जीतन राम मांझी, अण्णा द्रमुकचे थंबी दुराई, ‘ऑल झारखंड स्टुडंट्स युनियन’चे प्रमुख सुदेश महतो, ‘नॅशनल पीपल्स पार्टी’च्या खासदार अगाथा संगमा, तमिळ मनिला काँग्रेसचे प्रमुख जी. के. वासन व अपना दल (सोनेलाल) नेत्या अनुप्रिया पटेल आदी छोटय़ा पक्षांच्या नेत्यांनी ‘सदैव अटल’ या स्मृतिस्थळाचे दर्शन घेतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांनी वाजपेयींना आदरांजली वाहिली.