लोकसभा आणि राज्यसभेतून विरोधी पक्षातील १४१ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे उपसभापती जगदीप धनकड यांची नक्कल करून निषेध आंदोलन केले होते. ही नक्कल करत असताना काँग्रेस नेते राहुल गांधी हे आपल्या मोबाइलवर चित्रीकरण करताना दिसले. या घटनेचे पडसाद आज संसदेच्या दोन्ही सभागृहात उमटले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी एक्स या सोशल मीडिया साईटवर पोस्ट टाकून विरोधकांच्या कृतीचा निषेध व्यक्त केला. तसेच राज्यसभेचे नियमित कामकाज सुरू झाल्यानंतर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सर्व सत्ताधारी खासदार उभे राहून काम करणार असल्याचा ठराव मांडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हे वाचा >> Video: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उपराष्ट्रपतींना फोन, ‘त्या’ प्रकारावर खेद व्यक्त करत म्हणाले, “मी २० वर्षांपासून हा अपमान सहन करतोय!”

काय म्हणाले प्रल्हाद जोशी?

“काल आम्ही पाहिले की, सभापतींच्या संविधान पदाचा अपमान झाला. लोकसभेचे सदस्य राहुल गांधी यांनी आपली नक्कल होत असताना त्याचे चित्रीकरण केले. संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तिला अशाप्रकारे कलंकित करणे योग्य नाही. मी २० वर्षांपासून संसदेत सदस्य आहे. या काळात पहिल्यांदाच संसदेचे सदस्य इतक्या खालच्या पातळीवर गेल्याचे मी पाहत आहे. या प्रकाराची मी घोर निंदा करतो”, अशी भूमिका प्रल्हाद जोशी यांनी मांडली.

ते पुढे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी गरिब घरातून येतात, ते ओबीसी समाजातून येतात म्हणून त्यांचा अवमान केला गेला. त्यानंतर आदिवासी समाजातील एक महिला राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांचाही अपमान करण्यात आला. आता एका शेतकरी कुटुंबातून उपराष्ट्रपती झालेल्या माननीय सभापतींचा संसदेत अवमान करण्यात आला. पहिल्यांदाच जाट समाजाचा एक नेता उपराष्ट्रपतीपदावर पोहोचला. या पदावरील व्यक्तीचा अपमान करण्यात आला. त्यामुळे आम्ही उपराष्ट्रपताता अवमान आम्ही सहन करणार नाही. यासाठी आम्ही सर्व सदस्य प्रश्नोत्तराच्या तासात जागेवर उभे राहूनच काम करण्याचा निर्णय घेतला आहे. यातून आम्ही आपला सन्मान आणि विरोधकांचा निषेध करत आहोत.”

आणखी वाचा >> १४१ खासदारांचे निलंबन केल्यानंतर विरोधकांचे किती खासदार संसदेत उरले?

सभापतींनी केली बसण्याची विनंती

सत्ताधारी खासदारांनी घेतलेल्या निर्णयानंतर काही काळ सर्व खासदार जागेवर उभे राहून कामकाजात सहभाग झाले. त्यानंतर मात्र सभापती जगदीश धनकड यांनी सर्वांना बसण्याची विनंती केली. ते म्हणाले, “तुम्ही माझ्या सन्मानासाठी जी कृती केली, त्याबद्दल माझे मन भरून आले. मी कुणा एकाचे प्रतिनिधित्व करत नाही. मी संविधानिक पदावर बसलो असून संविधानाने दिलेल्या जबाबदाऱ्या मला पार पाडायच्या आहेत. त्यामुळे सर्व माननीय सदस्यांना मी बसण्याची विनंती करतो आणि कामकाज पुढे चालू ठेवावे, असे निर्देश देतो.”

राष्ट्रपतींनीही व्यक्त केला निषेध

“संसदेच्या आवारात आदरणीय उपराष्ट्रपतींचा ज्याप्रकारे अवमान झाला तो पाहून मला वाईट वाटले. निवडून आलेल्या खासदारांनी कसे वागावे, याचे त्यांना स्वातंत्र्य आहे. मात्र त्यांचे वागणे सौजन्याच्या निकषात बसणारे असावे. हीच संसदीय परंपरा राहिली आहे आणि भारतीय नागरिक ते कायम राखतील, अशी अपेक्षा आहे.