सध्या देशातील वातावरण पाहता भाजपा प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ३५० जागा मिळतील असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी केला आहे. मुंबईत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी हा दावा केला.

सध्या देशातील वातावरण भाजपा प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला अनुकूल आहे. एनडीएला ३५० जागा मिळतील. उत्तर प्रदेशात काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी एकत्र नाहीत. त्यामुळे मतविभाजनाचा भाजपाला फायदा होईल. उत्तर प्रदेशात भाजपाला ६५ पेक्षा जास्त जागा मिळतील असा दावा रामदास आठवले यांनी केला.

महाराष्ट्रात महायुतीला ४० पेक्षा जास्त जागा मिळतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आठवलेंनी यावेळी रिपब्लिकन ऐक्यावरही भाष्य केले. प्रकाश आंबेडकर आणि मी एकत्र आलो तर रिपब्लिकन ऐक्याची ताकद वाढेल असे ते म्हणाले.