नई दिल्ली नगरपालिका परिषदेने (एनडीएमसी) बुधवारी लुटियन्स दिल्लीतल्या एका रस्त्याचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. येथील एका रस्त्याचं नाव औरंगजेब लेन असं होतं जे आता बदललं जाणार आहे. या रस्त्याला भारताचे दिवंगत राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचं नाव दिलं जाणार आहे. एनडीएमसीच्या बैठकीत बुधवारी (२९ जून) याबाबतच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली.

याआधी ऑगस्ट २०१५ मध्ये एनडीएमसीने औरंगजेब रोडचं नाव बदलून डॉ. एपीजे अब्दुल कलाम रोड असं केलं होतं. पूर्व दिल्लीचे तत्कालीन खासदार महेश गिरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या रस्त्याचं नाव बदलण्याची विनंती केली होती. त्यानंतर औरंगजेब रोडला डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचं नाव देण्यात आलं.

Engravings on the wheels
चित्रास कारण की: जमिनीवरची मेंदी
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
humanity exists in mumbai
मुंबईत खरंच माणुसकी आहे! रिक्षाचालकाने हरवलेला फोन परत आणून दिला, नेटकरी म्हणाले, “मुंबईचे लोक खूप प्रामाणिक आहे…”
slum MIDC
एमआयडीसीलाही झोपड्यांच्या जागा, ‘क्लस्टर’साठी साडेबारा टक्के योजनेचा प्रस्ताव
Mumbai Metropolitan Region Development Authority Still waiting for Mogharpada car shed site Mumbai print news
मोघरपाडा कारशेडच्या जागेची प्रतीक्षा कायम; हस्तांतरणाबाबत शासन निर्णय प्रसिद्ध होऊन वर्ष उलटले तरी जागेचा ताबा नाही
Passenger service from Dadar to Ratnagiri stopped Mumbai news
दादरवरून थेट रत्नागिरी जाणारी पॅसेंजर सेवा बंद; प्रवाशांचे हाल
Roads Kharghar, Narendra Modi meeting,
पंतप्रधानांच्या सभेमुळे खारघरचे रस्ते चकाचक

आता इथल्या लेनचं नाव देखील बदललं आहे. औरंगजेब लेन मध्य दिल्लीत अब्दुल कलाम रोड आणि पृथ्वीराज रोडला जोडते. या लेनला पूर्वी औरंगजेब लेन असं नाव होतं. जे बदलून डॉ. एपीजे अब्दुल कलाम लेन असं करावं याबाबत एक प्रस्ताव सदस्य समितीसमोर ठेवण्यात आला होता, ज्याला आज (२८ जून) मंजुरी देण्यात आली.

हे ही वाचा >> तमिळनाडूच्या ऊर्जामंत्र्यांना ईडीने केलेली अटक वैध की अवैध? उच्च न्यायालयात तब्बल १६ तासांची मॅरेथॉन सुनावणी

एनडीएमसीचे उपाध्यक्ष सतीश उपाध्याय यांनी याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले की, लेनचं नाव बदलण्याचा प्रस्ताव नवी दिल्ली म्युनिसिपल अॅक्ट १९९४ च्या कलम २३१ च्या उप-कलम (१) च्या खंड अ संदर्भात मांडण्यात आला होता. त्यानंतर औरंगजेब लेनचं नामकरण डॉ. एपीजे अब्दुल कलाम लेन असं करण्यास परिषदेने मान्यता दिली आहे.