सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय व दंतवैद्यकीय अभ्यासक्रमासाठी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट- एनइइटी) अनिवार्य करण्याचा निकाल दिला असताना आता नीट परीक्षेची अंमलबजावणी एक वर्ष लांबणीवर टाकण्याचा वटहुकूम केंद्र सरकार काढणार असल्याचे समजते. नीट परीक्षेबाबत न्यायालयाच्या निकालाबाबत  सोमवारी झालेल्या चर्चेनंतर त्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. याबाबत अंतिम निर्णय झाला नसला तरी सरकारमध्ये एक मोठा गट सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी लांबणीवर टाकण्याच्या मताचा आहे.

Story img Loader