नीट परीक्षेचा पेपर लीक झाला हे सर्वांनाच माहिती असून हा पेपर कशा पद्धतीने लीक झाला, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत, अशी टीप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. तसेच जर या परीक्षेचा पेपर व्यापक स्वरुपात लीक झाला असेल, तर आम्हाला ही परीक्षा पुन्हा घेण्याचे निर्देश द्यावे लागतील, असेही न्यायालयाने म्हटले आहे. यूजीसी-नीट पेपर लीक प्रकरणातील दाखल विविध याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयाचे सुनावणी पार पाडली असून यावेळी सर्वोच्च न्यायालयाने अनेक प्रश्न उपस्थित केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरात जात आहात, शासकीय वसतिगृहांमध्ये मोफत प्रवेशाचा लाभ घ्या, मुलींसाठीही संधी, या तारेखपर्यंत…

सर्वोच्च न्यायालयाने नेमकं काय म्हटलं?

सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड म्हणाले, पेपर लीक झाला हे सर्वांना माहिती आहे. मात्र, तो पेपर कशापद्धतीने लीक झाला, हे बघणंदेखील महत्त्वाचे आहे. तसेच जर पेपर सोशल मीडियाच्या माध्यमातून लीक झाला असेल तर आम्हाला ही परीक्षा पुन्हा घेण्याचे निर्देश द्यावे लागतील. मात्र, केवळ दोन-तीन विद्यार्थ्यांनी काही चुकीचं कृत्य केलं असेल, तर त्यासाठी संपूर्ण परीक्षा रद्द करता येणार नाही. हा २३ लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे, अशी टीप्पणीही सरन्यायाधीशांनी केली.

एनटीए-सीबीआयला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश

या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने एनटीएला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले. नीट परीक्षेचा पेपर केव्हा लीक झाला? पेपल लीक झाल्याची तारीख अणि प्रत्यक्ष परीक्षा यांच्यात नेमका किती कालावधी होता? यासंदर्भातील प्रतिज्ञापत्र पुढील सुनावणीपूर्वी सादर करा, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं. तसेच याप्रकरणी सीबीआयने आतापर्यंत काय कारवाई केली? याबाबतची माहिती सादर करण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले.

हेही वाचा – धक्कादायक! आधी पीडित कुटुंबावर गोळीबार, मग स्वत:वर…; बलात्कार प्रकारणातील आरोपीचं कृत…

पुढील सुनावणी गुरुवारी

दरम्यान, याप्रकरणाची पुढील सुनावणी आता गुरुवारी ११ जुलै रोजी होणार आहे. त्यापूर्वी एनटीए आणि सीबीआयने अहवाल सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neet paper leak issue supreme court directs cbi and nta to submit report spb
Show comments