पीटीआय, नवी दिल्ली

वादग्रस्त नीट-यूजी परीक्षेसाठी ६ जुलैपासून सुरू होणारी विद्यार्थ्यांची समुपदेश प्रक्रिया पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. ५ मे रोजी घेण्यात आलेल्या नीट-यूजी परीक्षेत अनियमितता झाल्याने ही परीक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल टेस्टिंग एजन्सी आणि केंद्र सरकारला नोटीस पाठवली आहे. न्या. विक्रम नाथ आणि एसव्हीएन भट्टी यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने परीक्षेच्या संचालनातील अनियमिततेचा आरोप करणाऱ्या इतर प्रलंबित याचिकांसह हे प्रकरण ८ जुलै रोजी सुनावणीसाठी ठेवले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neet ug exam confusion court refusal to postpone the counseling process amy
First published on: 22-06-2024 at 07:02 IST