NEET Paper Leak : केंद्रीय अन्वेषण ब्युरोने मंगळवारी नीट युजी परीक्षेतील पेपर चोरणाऱ्या दोघांना अटक केली आहे. त्यांनी एकाने नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) ट्रंकमधून हे पेपर चोरले, असं वृत्त हिंदुस्थान टाईम्सने दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पंकज कुमार आणि राजू सिंग अशी त्यांची नावे आहेत. (NEET Paper Leak) पेपर चोरणे आणि ते पेपर वितरीत करण्यात या दोघांचा हात आहे. सीबीआयने काही दिवसांपूर्वी राकेश रंजन या मुख्य आरोपीला बिहारच्या नालंदा येथून अटक केली होती. राकेश रंजन हा पेपर लीकप्रकरणातील मुख्य आरोपी आहे. पंकज कुमार हा २०१७ सालचे नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ टेक्निलॉजी जमशेदूर येथून सिव्हिल इंजिनिअर आहे. त्याने हजारीबाग येथील सील असलेल्या ट्रंकमधून पेपर चोरले. तो बोकारो येथील रहिवासी असून त्याला पाटणा येथून अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा >> ‘नीट’ दिलेल्या २३ लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याविषयी काहीच गांभीर्य नाही?

राजू सिंग हा दुसरा आरोपी असून त्याने पेपर चोरण्यात आणि टोळीच्या इतर सदस्यांना पाठवण्यात मदत केली होती, असे पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे. सिंह यालाही हजारीबाग येथून अटक करण्यात आली. या दोघांसह, वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील पेपर लीकप्रकरणी (NEET Paper Leak) तोतयागिरी आणि इतर अनियमिततेप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची संख्या आता १४ वर पोहोचली आहे.

परीक्षेतील (NEET Paper Leak) कथित अनियमिततेची चौकशी करणाऱ्या तपास संस्थेने सहा एफआयआर नोंदवले आहेत. बिहारमधील एफआयआर पेपर लीकशी संबंधित आहेत तर उर्वरित गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्रातील उमेदवारांची तोतयागिरी आणि फसवणूकशी संबंधित आहेत.

सीबीआयकडून तपास सुरू

यंदाची ‘नीट-यूजी’ परीक्षा रद्द करून पुन्हा घ्यावी, तसेच परीक्षेमधील अनियमिततेचा न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास करावा अशी मागणी करणाऱ्या अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. त्यावर न्यायालयाने केंद्र सरकार आणि ‘एनटीए’ला नोटिसा बजावल्या होत्या. त्यावर शुक्रवारी केंद्र सरकार आणि ‘एनटीए’कडून स्वतंत्र प्रतिज्ञापत्रे दाखल करून उत्तरे देण्यात आली. ‘नीट-यूजी’ २०२४ परीक्षा पूर्णपणे रद्द केल्यामुळे लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांचे गंभीर नुकसान होईल आणि प्रश्नपत्रिका मोठ्या प्रमाणात फुटल्याचा कोणताही पुरावा नसताना असा निर्णय घेणे अतार्किक असेल असे केंद्र सरकारच्या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. ही परीक्षा देशव्यापी पातळीवर घेण्यात आली होती आणि त्याचा निकालही आधीच जाहीर झाला आहे याकडे केंद्र सरकारने न्यायालयाचे लक्ष वेधले. तसेच अनियमिततांच्या आरोपांचा सीबीआयकडून तपास सुरू आहे, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.