नागालॅण्डचे मुख्यमंत्री म्हणून नेफिऊ रिओ यांनी मंगळवारी सलग तिसऱ्यांदा शपथ घेतली. त्यांच्यासमवेत ११ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.राज भवनात झालेल्या दिमाखदार सोहळ्यात राज्यपाल निखिलकुमार यांनी सर्व मंत्र्यांना शपथ दिली. रिओ यांच्या मंत्रिमंडळातील ११ मंत्री त्यांच्याच पक्षाचे आहेत. नागा पीपल्स फ्रण्ट या पक्षाला भाजप आणि जदने(यू) पाठिंबा दिला असून या दोन्ही पक्षांचा प्रत्येकी एक आमदार आहे. नोके कोनयाक, टी. आर. झलियांग, जी. कैतो अये, इमकॉँग एल. इमचेन, कुझोलुझो निइनू, कियानेली पेसेयी, यंथुंगो पॅटन, सी. एम. चांग, ई. ई. पांगतेआंग, एस. पंगीयू फोम आणि आर. मेरेन्तोषी जमीर अशी शपथ घेतलेल्या मंत्र्यांची नावे आहेत.

Story img Loader