गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांची प्रकृती चिंताजनक बनलीये. मंडेला यांना गेल्या आठ जूनला फुफ्फुसातील जंतूसंसर्गामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीत चढ-उतार होत आहेत दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष जेकब झुमा यांनी रविवारी रात्री मंडेला यांच्या प्रकृतीबद्दल रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. त्यावेळी रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मंडेला यांची प्रकृती गेल्या २४ तासांपासून चिंताजनक असल्याचे सांगितले. मंडेला यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी डॉक्टर सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहेत, असे झुमा यांनी रुग्णालयातून बाहेर पडल्यावर सांगितले. झुमा यांनी मंडेला यांची पत्नी ग्रॅका मॅशेल यांचीही रुग्णालयात भेट घेतली.
नेल्सन मंडेला यांची प्रकृती चिंताजनक
गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांची प्रकृती चिंताजनक बनलीये.
First published on: 24-06-2013 at 11:30 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nelson mandela in critical condition