दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष नेल्सन मंडेला यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. फुप्फुसाच्या विकाराने ते आजारी असून सध्या त्यांची प्रकृती  स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
गेल्या सात महिन्यांच्या कालावधीत मंडेला यांना तिसऱ्यांदा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. शनिवारी  मंडेला यांची प्रकृती पुन्हा खालावली, त्यामुळे त्यांना प्रिटोरियातील हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.
मंडेला यांची प्रकृती चिंताजनक असली तरी स्थिर असल्याचे दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष झुमा यांचे प्रवक्ते मॅक महाराज यांनी सांगितले. मंडेला यांच्या प्रकृतीला आराम पडावा यासाठी डॉक्टर प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा