दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. “यावेळी त्यांची प्रकृती चिंताजनक आहे”, असे एका सरकारी प्रवक्त्याने शनिवारी स्थानिक वृत्तवाहिनीला सांगितले.
वर्णभेदविरोधी चळवळीतील नायक म्हणून ओळखले जाणारे ९४ वर्षीय मंडेला हे दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष झाले होते. शनिवारी सकाळी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या फुफ्फुसांना संसर्ग झाला असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱया डॉक्टरांनी सांगितले आहे. “परिस्थिती चिंताजनक असली तरी त्यांच्यावर उपचार करणारया डॉक्टरांनी ते ठीकहोतील असा दिलासा दिला आहे.”, राष्ट्राध्यक्ष जॅकब झुमा यांच्या कार्यालयातून प्रसिध्द करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
त्यांच्यावर विशेष वैद्यकीय तज्ज्ञांद्वारे उपचार सुरू असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.