भारतात असलेली अयोध्या ही बनावट आहे. प्रभू रामचंद्र हे भारतीय नाही तर नेपाळी होते असं वक्तव्य करणाऱ्या नेपाळचे काळजीवाहक पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी आणखी एक दावा केला आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी मोठा दावा केला आहे. योगाचा सुरुवात भारतात नव्हे तर नेपाळमध्ये झाला. जगात योगाची सुरुवात झाली तेव्हा भारत अस्तित्वात नव्हता असे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी म्हटले आहे.
केपी ओली यांनी त्यांच्या निवासस्थानी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना हा दावा केला आहे. “भारतीय तज्ञ या संदर्भात तथ्य लपवत आले आहेत. आता अस्तित्वात असलेला भारत भूतकाळात नव्हता. त्यावेळी भारत वेगवेगळ्या गटात विभागलेला होता. वेगवेगळ्या गटांमध्ये विभागलेला भारत त्यावेळी खंड किंवा उपखंडासारखा होता”, असे ओली म्हणाले.
“भारतात बनवाट अयोध्या, खरी अयोध्या नेपाळमध्ये; प्रभू रामचंद्र नेपाळी”
“योगाची सुरुवात भारतात झाली नाही. योगाचा शोध लागला तेव्हा भारताची निर्मिती झाली नव्हती. भारतासारखा कोणताही देश नव्हता कारण योगाची सुरुवात होण्याच्या वेळी नेपाळमध्ये बरीच सीमान्त राज्ये होती. म्हणून योगाची सुरुवात नेपाळ किंवा उत्तराखंडच्या आसपास झाला. योगाचा शोध घेणाऱ्या आपल्या ऋषींना आपण कधीही श्रेय दिले नाही. नेहमी दुसऱ्या प्राध्यापकांच्या योगदानाबद्दल बोललात. आम्ही आमचा दावा योग्यरित्या मांडू शकलो नाही. आम्ही याला जगभरात नेऊ शकलो नाही. भारतीय पंतप्रधान मोदी यांनी वर्षातील सर्वात मोठ्या दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचा प्रस्ताव देऊन हे योगाला प्रसिद्धी दिली. मग याला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली.” असे ओली म्हणाले.
विश्वासदर्शक ठराव गमवल्यानंतरही केपी शर्मा ओली पुन्हा नेपाळच्या पंतप्रधानपदी
दरम्यान, याआधी देखील नेपाळचे काळजीवाहक पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी सातत्याने भारतावर निशाणा साधत होता. ओली यांनी सांस्कृतिक अतिक्रमणासाठी भारताने बनावट अयोध्या निर्माण केल्याचा दावा केला होता. अयोध्या भारतात नसून नेपाळमध्ये आहे. प्रभू रामचंद्र हे भारतीय नाही तर नेपाळी असल्याचंही त्यांनी म्हटले होते. इतकंच नाही तर नेपाळवर सांस्कृतिकदृष्ट्या अत्याचार केला गेल्याचंही त्यांनी म्हटलं. याआधी करोना संसर्गावरुनही त्यांनी भारतावर टीका केली होती. भारतातून येणार करोनाचं संक्रमण हे चीन आणि इटलीतून येणाऱ्या संक्रमणापेक्षा जास्त घातक आहे असं त्यांनी म्हटलं होतं.