Earthquake Hits Nepal Affecting Indian States : नेपाळच्या सीमेजवळ दक्षिण तिबेट मंगळवारी सकाळी भूकंपाच्या मालिकेने हादरले, ज्याचे धक्के उत्तर भारतातील अनेक भागातही जाणवले. यातील सर्वात शक्तिशाली, ७.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा धक्का, नेपाळमध्ये एप्रिल २०१५ मध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर या प्रदेशातील सर्वात शक्तिशाली होता. २०१५ मध्ये नेपाळमध्ये आलेल्या भूकंपामध्ये सुमारे दहा हजार लोक मारले गेले होते.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सांगितले की, तिबेट भागातील जिजांगमध्ये मंगळवारी सकाळी भूकंप झाला. येथे सकाळी ६.३० वाजता १० किमी खोलीवर ७.१ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्यानंतर ७:०२ वाजता ४.७ रिश्टर स्केलचा, ७:०७ वाजता ४.९ रिश्टर स्केलचा आणि ७:१३ वाजता पाच रिश्टर स्केलचा भूकंप झाला.
५३ लोकांचा मृत्यू
या भूकंपामुळे पश्चिम चीन आणि शेजारील नेपाळमध्ये आतापर्यंत ९५ लोक ठार झाले असून, अनेक लोक यामध्ये अडकले आहेत. सिन्हुआ न्यूज एजन्सीनुसार, प्रादेशिक आपत्ती निवारण मुख्यालयाने दिलेल्या वृत्तानुसार, १०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेण्यासाठी अंदाजे १५०० बचाव कर्मचारी पाठवण्यात आले आहेत. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने हा भूकं ७.१ रिश्टर स्कोल तीव्रतेचा असल्याचे नोंदवले आहे. तर, चीनने हा भूकंप ६.८ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा असल्याचे म्हटले आहे.
सोशल मीडिया युजर्सनी केलेल्या पोस्ट्सनुसार, पाटणा आणि सारणसह बिहारच्या काही भागांमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. यावेळी पश्चिम बंगाल आणि आसामच्या काही भागातही भूकंपाचे धक्के जाणवल्याचे सोशल मीडिया युजर्सनी सांगितले आहे.
हे ही वाचा : AAP Leader Video: …आणि आप नेत्यानं अचानक कंबरेचा पट्टा काढून स्वत:लाच मारायला सुरुवात केली; नेमकं घडलं काय?
या भूकंपांच्या मालिकेचा भारतावरही परिणाम झाला आहे. भारतातील बिहार, बंगाल आणि आसाममध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. मात्र, नेपाळमध्ये किती जीवित किंवा वित्तहानी झाली याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. काही व्हिडिओ समोर आले आहेत ज्यात भूकंपानंतर लोक घराबाहेर पडताना आणि बाहेर उघड्यावर उभे असल्याचे दिसत आहे.
हे ही वाचा : ‘एचएमपीव्ही’चे आधीपासूनच अस्तित्व! केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती; परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याची ग्वाही
बिहारच्या मोतिहारी, समस्तीपूर, दरभंगा, मधुबनी, पूर्णिया, सिवान, अररिया, सुपौल आणि मुझफ्फरपूर येथे सकाळी ६.४० च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोक घाबरून घराबाहेर पडले.
नेपाळमध्ये २०२५ ची सुरुवात भूकंपाच्या धक्क्यांनी झाली आहे. नेपाळमध्ये गेल्या ७ दिवसात ३ वेळा भूकंप झाला आहे. यामध्ये ३ जानेवारीला झालेल्या भूकंपाची ४.४ रिश्टर स्केल एवढी होती. तर, २ जानेवारीच्या भूकंपाची तीव्रता ४.८ रिश्टर स्केल इतकी होती.