नेपाळमध्ये १४ वर्षाखालील मुलींचा भारतीय फुटबॉल संघ अडकल्याची माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दिली. सुषमा स्वराज यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटद्वारे ही माहिती दिली आहे.
भूकंपग्रस्त झालेल्या नेपाळमधून १४ वर्षांखालील भारतीय मुलींच्या फुटबॉल संघाला आणण्याला प्रथम प्राधान्य देणार आहे असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. भारत सरकार पूर्ण ताकदीने नेपाळमधील भारतीयांची वापसी करण्याचा प्रयत्न करत आहे. तर भारताकडून नेपाळमध्ये वेगात बचावकार्य सुरू असून पराराष्ट्र मंत्रालय बारकाईने नजर ठेवून असल्याचेही सुषमा स्वराज यांनी म्हटले आहे.
भारतीय फुटबॉल संघ शनिवारी सायंकाळी इराण संघाविरुद्ध तिसऱ्या स्थानासाठी खेळणार होता. त्यापूर्वीच भूकंपाचे धक्के जाणवले. इराणविरुद्ध होणा-या तिस-या स्थानासाठीच्या सामन्यासाठी मुलींचा संघ सराव करत होता. त्याचयावेळी आम्हाला भूकंपाचे धक्के जाणवू लागले. आम्ही मैदानाच्या मध्यभागी धावत घेतली आणि आम्हाला त्या भागातील अनेक इमारती कोसळत दिसल्या. तो अतिशय भयानक क्षण होता, असे संघाचे प्रशिक्षक मयमूल रॉकी यांनी सांगिले.भूकंपोत्तर धक्क्यांमुळे मुलींच्या मनात भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे हॉटेलमध्ये जाण्यासही त्यांनी नकार दिला.
संग्रहित लेख, दिनांक 26th Apr 2015 रोजी प्रकाशित
‘मुलींच्या फुटबॉल संघाला पुन्हा आणण्यास प्राधान्य’
नेपाळमध्ये १४ वर्षाखालील मुलींचा भारतीय फुटबॉल संघ अडकल्याची माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दिली.
First published on: 26-04-2015 at 12:33 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nepal earthquake stranded u 14 girls football team to be evacuated on priority says swaraj