नेपाळमध्ये रविवारी कोसळलेल्या तारा एअरलाइन्सच्या विमानाचे अवशेष सापडल्यानंतर आता या विमानातून प्रवास करत असलेल्या १४ प्रवाशांचे मृतदेह सापडले आहेत. अजूनही बाकीच्या प्रवाशांचा शोध घेतला जात असून जपानच्या गृहमंत्रालयाने सर्व २२ प्रवाशांचा मृत्यू झाला असावा, अशी शंका व्यक्त केली आहे.

हेही वाचा >>> सिद्धू मुसेवाला यांच्या आईची संतप्त प्रतिक्रिया, मुलाच्या हत्येला पंजाब सरकार जबाबदार असल्याचा आरोप

newborn babies killed jhansi marathi news
अन्वयार्थ : ‘उत्तम प्रदेशा’तल्या बाळांची होरपळ
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Baba Siddiqui murder case Arrest of accused financial helper Mumbai
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण: आरोपींना आर्थिक मदत करणाऱ्याला अटक
Amit Shah left public meeting after five minutes due to fear of helicopter couldnt fly after 6 pm
हेलिकॉप्टर उडणार नाही ही भीती; पाच मिनिट अन् गृहमंत्री अमित शहा सभा सोडून…
pune accidents latest marathi news
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू
deceased Raghunandan Jitendra Paswan
बिहारी तरुणाची मुंबईत हत्या; आंतरधर्मीय संबंधांतून हत्या झाल्याचा पोलिसांना संशय
passenger two-wheeler died, dumper hit Bopodi,
डंपरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू, मुंबई-पुणे रस्त्यावरील बोपोडीत अपघात
Baba Siddique murder case, Five people in police custody, Baba Siddique news, Baba Siddique latest news,
पाच जणांना १९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी, बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण

नेपाळमध्ये तारा एअरलाइनची फ्लाईट ९ एनएईटी पोखरा येथून जोमसोमला जात होती. रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास हे विमान अचानक बेपत्ता झाले होते. या घटनेनंतर बचाव पथकाला या विमानाचे अवशेष सापडले होते. आता याविमानातील १४ जणांचे मृतदेह सापडले आहेत. रविवारी दिवसभर शोधमोहीम राबवल्यानंतर दुपारी ४ वाजता विमान कोसळल्याची पुष्टी करण्यात आली. या विमानात तीन क्रू मेंबर्ससह एकूण २२ जण होते. यामध्ये ४ प्रवासी भारतीय होते. तर जर्मनीचे २ आणि १३ प्रवाशी नेपाळ देशाचे होते. अपघातग्रस्त विमान ३० वर्षांहून अधिक जुनं असल्याची माहितीही समोर आली आहे.

हेही वाचा >>> नेपाळमधील अपघातग्रस्त विमानाचे अवशेष सापडले; अंगावर काटा आणणारे PHOTO आले समोर

“या विमानात प्रवास करणाऱ्या सर्वच प्रवाशांना आपला जीव गमवावा लागल्याचा आम्हाला संशय आहे. आमच्या प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेत सर्वांचाच मृत्यू झाला असावा, मात्र अजूनही अधिकृत माहिती येण्याची आम्ही वाट पाहत आहोत,” असे नेपाळ गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले आहे.

हेही वाचा >>> Video : जगप्रसिद्ध मोनालिसा पेंटिंग धोक्यात! महिलेचा वेश धारण करत कलाकृतीला विद्रूप करण्याचा प्रयत्न

त्रिपाठी-बांदेकर कुटुंब विमानात प्रवास करत होते

नेपाळमधील या विमान दुर्घटनेत चार भारतीयांचा समावेश आहे. हे भारतीय मूळचे ठाण्याचे असून यामध्ये अशोक कुमार त्रिपाठी आणि वैभवी बांदेकर हे विभक्त दाम्पत्य तसेच धनुष आणि रितिका या त्यांच्या मुलांचा समावेश आहे. अशोक कुमार आणि वैभवी हे विभक्त दाम्पत्य आपल्या मुलांना वर्षातून एकदा परदेश पर्यटनासाठी घेऊन जात असे. यंदा ते मुलांना घेऊन नेपाळला गेले होते. सध्या त्यांचादेखील शेध सुरु आहे.