Nepal Plane Crash: नेपाळच्या पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळानजीक ७२ लोक घेऊन जाणारे विमान अपघातग्रस्त झालं आहे. या विमानातून प्रवास करणाऱ्या सर्वांचा मृत्यू झाला आहे. या विमानात ६८ प्रवाशी आणि चार क्रू सदस्य होते. एटीआर-७२ हे प्रवासी विमान ७२ जणांना घेऊन काठमांडू ते पोखरा या मार्गावर होते. या विमानाने आज सकाळी साडेदहा वाजता त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केलं होतं.

पोखरा विमानतळावर लँडिंग करण्याच्या दहा सेकंद आधी हे विमान अपघातग्रस्त झाले आहेत. या विमानातील सर्वजण मृत पावल्याचं वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे. हे विमान पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळापासून काही अंतरावर असणाऱ्या सेती गंडकी नदीच्या काठावरील जंगलात कोसळलं.

IAF Mirage 2000 fighter aircraft crashes in Shivpuri, Madhya Pradesh.
Mirage 2000 Crash : भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान मिराज २००० कोसळले, भयंकर अपघाताचा व्हिडिओ व्हायरल
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
nashi four year old boy died after being found under car in premises of Hotel Express in
सांगोल्याजवळ वाहनांची धडक बसून दोन ऊसतोड मजुरांचा मृत्यू
Mumbai airport accident
मुंबई विमानतळावर आलिशान गाडीच्या अपघातात पाच जण जखमी
Accident
Accident : दाट धुक्याने घात केला! १२ प्रवासी असलेली क्रूझर कार कोसळळी कालव्यात; १० जण बेपत्ता
Plane Crashes In Philadelphia
US Plane Crash : अमेरिकेत भीषण विमान अपघात; टेकऑफनंतर ३० सेकंदातच विमान कोसळलं, अनेक घरांना लागली आग
Washington DC Plane Crash USA
US Plane Crash : अमेरिकेत ६४ प्रवाशांना घेऊन निघालेल्या विमानाची लष्कराच्या हेलिकॉप्टरला धडक, ३० मृतदेह सापडले
South Sudan Plane Crash
Plane Crash : दक्षिण सुदानमध्ये भीषण विमान अपघात, २१ जणांपैकी फक्त एकजण वाचला; मृतांमध्ये भारतीय नागरिकाचाही समावेश

PHOTOS : लँडिंगच्या अवघ्या काही सेकंद अगोदर काळाची झडप; भीषण विमान दुर्घटनेत ५ भारतीयांसह ७२ जणांचा मृत्यू

हे विमान अपघातग्रस्त होताच विमानाला भीषण आग लागली. बचाव दलाचे कर्मचारी आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. या विमानात ११ परदेशी पर्यटकांसह तीन नवजात मुलं होती. अपघाताच्या वेळी विमानात ५३ नेपाळी, पाच भारतीय, चार रशियन, एक आयरिश नागरिक, दोन कोरियन, एक अर्जेंटिनाचा आणि एक फ्रेंच नागरिक होता,” अशी माहिती विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

विश्लेषण : नेपाळमध्ये हवाई वाहतूक धोकादायक का आहे?

या घटनेनंतर नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांनी दुःख व्यक्त केले आहे. प्रचंड यांनी सर्व सरकारी यंत्रणांना बचाव कार्यात सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कॅबिनेटची तातडीची बैठक बोलावून परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

Story img Loader