उत्तराखंडच्या डेहराडून येथे तैनात असलेल्या लष्करातील लेफ्टनंट कर्नलला एका नेपाळी महिलेच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या हत्येची उकल पोलिसांनी अवघ्या २४ तासांत केली. ही महिला नेपाळची असून ती सिलीगुडी येथे राहत होती, असे पोलिसांना त्यांच्या तपासात निष्पन्न झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डेहराडून पोलिसांना सिरवाल गड परिसरात एका महिलेचा मृतदेह संशयास्पद स्थितीत सापडला. त्यामुळे पोलिसांनी या मृतदेहाबाबत तपासणी सुरू केली. या तपासणीत या महिलेची हत्या लेफ्टनंट कर्नल रामेंदू उप्याध्याय यांनी केल्याचं निष्पन्न झालं. त्यांना अटक करण्यात आली असून पुढील चौकशी सुरू आहे.

लेफ्टनंट कर्नल हे डेहराडून येथे तैनात होते. त्यांची सिलिगुडी येथील एका डान्सबारमध्ये ३० वर्षीय तरुणीशी ओळख झाली. तेव्हापासून त्यांचं प्रेमप्रकरण सुरू होतं. गेल्या तीन वर्षांपासून ते विवाह्यबाह्य प्रेमसंबंधात होते. रामेंदू यांची डेहराडूनला बदली झाली तेव्हा त्यांनी या तरुणीलाही डेहराडूनला आणले. डेहराडूनला ते फ्लॅट भाड्याने घेऊन राहत होते.

शनिवारी रात्री राजपूर रोडवरील एका क्लबमध्ये उपाध्याययांनी महिलेसोबत मद्यप्राशन केले होते. त्यातच त्यांनी तरुणीला लाँग ड्राईव्हला येण्याची विनंती केली. दोघेही लाँग ड्राईव्हला गेल्यानंतर शहराच्या सीमेवरील थानो रोड या निर्जन ठिकाणी पोहोचल्यानंतर पहाटे दीडच्या सुमारास त्यांनी तिथे कार उभी केली. तिकडेच त्यांनी तिच्या डोक्यावर हातोड्याने वार केला. यामुळे तरुणीचा मृत्यू झाला. ही महिला सतत लग्नाचा तगादा लावत होती, परंतु उपाध्याय यांचं आधीच लग्न झालं होतं, त्यामुळे त लग्नाला नकार देत होते. लग्नाच्या तगाद्यामुळे उपाध्याय यांनी तिची हत्या केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nepali womans affair with married army officer ends in a dehradun murder sgk