Ness Wadia : २८३ वर्ष जुन्या वाडिया ग्रुपचे वारसदार असणारे नेस वाडिया यांना ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी जपानमध्ये दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नेस वाडिया यांना मार्च महिन्यात होक्काइडो आयर्लंडच्या एका विमानतळावरुन अटक करण्यात आली होती. त्यांच्याजवळ २५ ग्रॅम ड्रग्ज सापडले होते. याप्रकरणी न्यायालयाने त्यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान ही शिक्षा पाच वर्षांसाठी सस्पेंड राहणार आहे. यादरम्यान जर नेस वाडिया जपानमध्ये इतर कोणतं बेकायदेशीर कृत्य करताना आढळले तर त्यांची जेलमध्ये रवानगी करण्यात येणार आहे.
स्थानिक ब्रॉडकास्टर एनएचकेने दिलेल्या वृत्तानुसार, स्निफर डॉगने दिलेल्या अलर्टनंतर विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्यांनी नेस वाडिया यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे २५ ग्रॅम ड्रग्ज आढळले होते.
मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार, नेस वाडिया यांना २० मार्चच्या आधी जपान पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर जामीनावर सुटून ते भारतात परतले होते. खासगी वापरासाठी आपण ड्रग्ज बाळगल्याची कबुली त्यांनी दिली होती. २०२२ मध्ये टोकियोत ऑलिम्पिक्स पार पडणार आहे. याशिवाय यावर्षी रग्बी वर्ल्ड कप पार पडणार आहे. या पार्श्वभुमीवर जपानमध्ये अंमली पदार्थ विरोधी कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी केली जात आहे.
Spokesperson, The Wadia Group on Ness Wadia sentenced to 2-yr jail term in Japan for drugs possession: Ness Wadia is in India. The judgement is clear. It’s a suspended sentence. Hence it won’t impact Ness Wadia in the discharge of any of his responsibilities. (File pic) pic.twitter.com/cAUeGvJShN
— ANI (@ANI) April 30, 2019
नेस वाडिया आयपीएल संघ किंग्ज इलेव्हन पंजाबचे सहमालक आहेत. बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटाबोसत असलेल्या प्रेमसंबंधांमुळेही ते चर्चेत आले होते. २०१४ रोजी प्रिती झिंटाने नेस वाडिया यांच्याविरोधात छळ केल्याचा आरोप केला होता. पण नंतर तिने तक्रार मागे घेतली होती.
वाडिया देशातील श्रीमंत कुटुंबांपैकी एक आहे. वाडिया समूहात बॉम्बे डाईंग, ब्रिटानिया, गो एअर विमान यांच्यासहित अन्य काही कंपन्यांचा समावेश असून वाडिया कुटुंबाची संपत्ती सातशे कोटी रुपयांच्या घरात आहे.