Netflix News : नेटफ्लिक्स सध्या दोन देशांतील तपास यंत्रणाच्या निशाण्यावर आहे. नेटफ्लिक्सच्या फ्रान्स आणि नेदरलँडमधील कार्यालयांवर पोलिसांनी मंगळवारी छापे टाकले असल्याची माहिती समोर आली आहे. फसवणूक आणि भ्रष्टाचाराच्या संदर्भाने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. हे सर्व प्रकरण आर्थिक अनियमिततेच्या संबंधित आहे. फ्रान्स आणि नेदरलँड या दोन्ही देशांचे अधिकारी मागील काही महिन्यांपासून या प्रकरणासंदर्भात काम करत असल्याचंही सांगितलं जात आहे.

या संपूर्ण प्रकरणासंदर्भात बोलताना फ्रान्सच्या एका न्यायिक अधिकाऱ्याने सांगितलं की, कर फसवणूक आणि आर्थिक अनियमिततेबाबत चौकशी केली जात आहे. तसेच नेदरलँडमध्ये फ्रेंच अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार कारवाई केली जात आहे. यासंदर्भातील वृत्त सूत्रांच्या हवाल्यावरून टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

supreme-court-
“प्रत्येक वैयक्तिक मालमत्ता समाजासाठी उपयुक्त संपत्ती असू शकत नाही”, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय!
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार…
Ward Boy Performs ECG Jodhpur :
Jodhpur : धक्कादायक! यूट्यूबवर व्हिडीओ पाहून केला रुग्णाचा ‘ईसीजी’; व्हिडीओ व्हायरल, कुठे घडली घटना?
pakistani celebrated diwali
Video : पाकिस्तानी सेलिब्रिटींनी ‘अशी’ साजरी केली दिवाळी, व्हिडीओ शेअर करत म्हणाले…
What is Netflix Moments
What is Netflix Moments : आता नेटफ्लिक्सवर मालिका, चित्रपटातील आवडता सीन शेअर करण्याची सोय; वाचा कसं वापरायचं हे फीचर
Best Movies On Prime Video
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये घरबसल्या पाहता येतील ‘हे’ चित्रपट; प्राइम व्हिडीओवरील उत्तम सिनेमांची यादी
man light a small rocket using Alexa
“अलेक्सा रॉकेट लाँच कर…” मालकाने सूचना देताच फटाके फोडण्यासाठी Alexa तयार, पाहा दिवाळीचा हा खास VIRAL VIDEO
Kasarwadvali Police, Thane, Kasarwadvali Police Station Electronic items, Kasarwadvali Police Station,
‘फुकट फौजदारां’कडून महागड्या वस्तूंचा वापर, मुंबई उच्च न्यायालयाचे चौकशीचे आदेश

हेही वाचा : Supreme Court : “ही मनमानी…”, बुलडोझर कारवाईवरून योगी सरकारला सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं; २५ लाखांच्या भरपाईचे आदेश

दरम्यान, फ्रान्समधील नेटफ्लिक्सच्या मुख्यालयात फ्रेंच पोलिसांनी शोधमोहीम राबवली आहे. फ्रेंच नॅशनल प्रोसिक्युटर्स ऑफिसच्या अधिकाऱ्यांसह पोलिसांचे विशेष पथक शोध मोहीम राबवत आहेत. याबाबत नेटफ्लिक्सच्या प्रवक्त्याने म्हटलं आहे की, ते फ्रेंच अधिकाऱ्यांसह तपासासाठी पूर्ण सहकार्य करत आहेत. तसेच कंपनीचं म्हणणं आहे की, ते स्थानिक अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. तसेच सर्व कर नियमांचे पालनही करण्यात येत आहेत. कंपनी कोणत्याही देशात व्यवसाय करते. त्यामुळे कंपनी नेहमी कोणत्याही देशाच्या कायद्यांचे पालन करते.

दरम्यान, फ्रेंच अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, ही चौकशी नोव्हेंबर २०२२ मध्ये सुरू झाली होती. फ्रान्सच्या नॅशनल फायनान्शियल प्रॉसिक्युटर ऑफिसच्या म्हणण्यांनुसार नोव्हेंबर २०२२ मध्ये प्राथमिक तपासातून आर्थिक अनियमिततेबाबत काही गोष्टी आढळून आल्या आहेत. २०१९ आणि २०२० मधील नेटफ्लिक्स कंपनीचा फ्रेंच महसूल अंदाजे ६ दशलक्ष वापरकर्त्यांच्या ग्राहक संख्येशी विसंगत दिसला. फ्रेंच मीडियानुसार, नेटफ्लिक्सने २०१९ आणि २०२० मध्ये कॉर्पोरेट करांमध्ये फक्त १.०६ दशलक्ष भरले. मात्र, पुढे २०२० मध्ये फ्रान्समध्ये नेटफ्लिक्सची उलाढाल वाढली.