देशात करोनाच्या रुग्णसंख्येत नियमित झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत देशात १० हजार नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. कालही जवळपास आठ हजार नवे रुग्ण बाधित झाले होते. दिवसागणिक वाढत जाणाऱ्या रुग्णसंख्येवर आळा घालता यावा, संभाव्य परिस्थितीवर नियंत्रण मिळवता यावं याकरिता केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. करोनाच्या पहिल्या, दुसऱ्या लाटेत ज्याप्रमाणे नागरिकांना असुविधेचा सामना करायला लागला होता, तसा यावेळी करायला लागू नये, याकरिता केंद्र सरकारने आरोग्य यंत्रणांना सज्ज राहण्यास सांगितले आहेत.

सोमवार आणि मंगळवारी देशभर दोन दिवसीय मॉक ड्रिल पार पडले. यामुळे देशभरात उपलब्ध असलेल्या वैद्यकीय सामुग्री, उपकरणांची माहिती मिळाली आहे. यानुसार देशात जवळपास ९० टक्के आयसोलेशन, ऑक्सिजन, आयसीयू बेड्स केवळ करोना रुग्णांवर उपचार करण्याकरता उपलब्ध असल्याचं स्पष्ट झालं आहे. इंडियन एक्स्प्रेस संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, २.८ लाख आयसोलेशन बेड्स, ३.०४ लाख ऑक्सिजन बेड्स, ५४ हजार आयसीयू बेड्स आणि व्हेंटिलेटर करोना रुग्णांवर उपचार करण्याकरता उपलब्ध आहेत.

I don’t believe in work-life balance Narayana Murthy stands firm on 70-hour workweek
“माझा वर्क-लाइफ बॅलन्सवर विश्वास नाही”; आठवड्यातील ७० तास काम करण्याच्या मतावर नारायण मूर्ती अजूनही ठाम
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
ambulance
गर्भवती महिलेचा थोडक्यात वाचला जीव! रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट, थरारक Video कॅमेऱ्यात कैद
nashik vidhan sabha
नाशिक: एकाच दिवसात ३४९ गुन्हेगार हद्दपार
Greater Noida
Greater Noida : डोळ्यावर शस्त्रक्रिया न करताच हॉस्पिटलने ४५ हजार उकळले; दुसऱ्या डॉक्टरनी तपासल्यानंतर झालं उघड
Nurses without pay for four months Mumbai print news
परिचारिका चार महिने वेतनाविना
Vidhan Sabha election, Pune blood shortage, Pune,
विधानसभा निवडणुकीमुळे पुण्यावर रक्तटंचाईचे सावट! रक्तपेढ्यांमध्ये पाच दिवसांचाच रक्ताचा साठा शिल्लक
mumbai weather updates city records moderate air quality
मुंबईतील हवेचा दर्जा मध्यम श्रेणीतच

हेही वाचा – भारतात करोना संसर्ग का वाढतोय? इंडियन मेडिकल असोसिएशनने सांगितली तीन कारणं

किती वैद्यकीय उपकरणे उपलब्ध?

देशभरात एकूण २.४८ लाख आयसोलेशन बेड्स असून, त्यापैकी २.१८ लाख म्हणजेच जवळपास ८७.९ टक्के बेड्स केवळ करोना रुग्णांवर उपचार करण्याकरिता उपलब्ध आहेत. तर, देशात एकूण ३.३५ लाख ऑक्सिजन बेड्स असून त्यापैकी ३.०४ लाख म्हणजेच जवळपास ९०.७ टक्के करोना रुग्णांसाठी वापरण्यात येणार आहेत. आयसीयू बेड्स ९४ हजार ९९९ असून यापैकी ९० हजार ७८५ (९५.५ टक्के) बेड्स करोना रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. तसेच आयसीयू बेड्ससह व्हेंटिलेटरचीही सज्जता ठेवण्यात आली आहे. देशात ६० हजार ९९४ आयसीयू बेड्ससह व्हेंटिलेटर उपलब्ध असून त्यापैकी ५४ हजार ४० (८८.५ टक्के) करोना रुग्णांच्या उपचारांसाठी वापरण्यात येणार आहे. तसंच, देशभरात ११ हजार ३४४ प्रेशर स्विंग अॅडजोपर्शन ऑक्सिजन प्लांट्स (Pressure Swing Adsorption oxygen plants) उपलब्ध असून ६.८५ लाख ऑक्सिजन सिलिंडर्स आणि २.६१ लाख ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर्सचीही (oxygen concentrators) सज्जता ठेवण्यात आली आहे.

गेल्या २४ तासांत भारतात १० हजार १५८ कोरोना रुग्णांची वाढ झाली असून सध्या देशात ४४ हजार ९९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या नव्या रुग्णसंख्येमुळे पॉझिटीव्हिटी रेट ४.४२ टक्के झाला आहे. तर आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट ४.०२ टक्के असून एकूण अॅक्टिव्ह रुग्णांचं प्रमाण ०.१० टक्के आहे.