नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) शुक्रवारी UGC-NET २०२४ परीक्षेच्या नवीन तारखा जाहीर केल्या. ही परीक्षा आता २१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान पुन्हा घेतली जाईल, असे NTA ने शुक्रवारी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.

UGC-NET जून २०२४ परीक्षा यापूर्वी ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आली होती. परंतु, ती आता संगणक-आधारित चाचणी (CBT) मोडमध्ये घेतली जाईल, असं अधिसूचनेत म्हटलं आहे.

UGC NET Exam 2024 Canceled Update in Marathi
UGC NET Exam 2024 : मोठी बातमी! यूजीसी नेट परीक्षा रद्द; पेपर फुटल्याचा संशय, शिक्षण मंत्रालयाने दिली माहिती
NEET, Hasan Mushrif,
‘नीट’ परीक्षा तात्काळ रद्द करावी, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ
Who is Ravi Atri?
NEET UG Row : ‘नीट’ पेपरफुटीचा मास्टरमाईंड रवी अत्री कोण आहे?
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
School Student Funny Marathi Love Letter Viral
PHOTO: “प्रिय आकाश तु मला प्रपोज केलं” शाळेतल्या मुलांचं ‘लव्ह लेटर’ व्हायरल; वाचून पोट धरुन हसाल
nilesh lanke sharad pawar
“निलेश लंकेंना संसदेत पाहून लोक विचारतील, हा कोण…”, शरद पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “ते मराठीत काय बोलतील…”
what is ugc net
नेट परीक्षा नेमकी असते कशासाठी? काय विचारलं जातं आणि या परीक्षेला एवढी मागणी का? जाणून घ्या…

तसेच, NCET २०२४ साठी संगणक आधारित चाचणीची तारीख १० जुलै असेल, तर संयुक्त CSIR-UGC NET परीक्षा २५ जुलै ते २७ जुलै या कालावधीत होईल. दरम्यान, अखिल भारतीय आयुष पदव्युत्तर प्रवेश परीक्षा (AIAPGET) २०२४ पूर्वीच्या नियोजित वेळेनुसार ६ जुलै रोजी होणार आहे.

यापूर्वी १८ आणि १९ जून रोजी परीक्षा नियोजित करण्यात आली होती. १८ जूनच्या परीक्षेला ३१७ हून अधिक शहरांमध्ये दोन शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यात आली. यामध्ये जवळपास ९ लाखांहून अधिक उमेदवारांनी परीक्षा दिली. परंतु, १९ जूनची परीक्षा रद्द करण्यात आली. पेपर लीक झाल्याचे कारण देत ही परीक्षा रद्द करण्यात आली. “डार्कनेटवरील UGC-NET प्रश्नपत्रिका UGC-NET च्या मूळ प्रश्नपत्रिकेशी जुळत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आम्ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या पेपरफुटीची आम्ही जबाबदारी घेतो आणि व्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न करतो”, असं नवनिर्वाचित शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले.

हेही वाचा >> नीट पेपरफुटी प्रकरणात दोघांना अटक

सीएसआयआर यूजीसी नेटवरही परिणाम

सीएसआयआर यूजीसी नेटवरही या पेपरफुटीचा परिणाम झाला. ही परीक्षा २५ ते २७ जून रोजी होणार होती. याचीही प्रश्नपत्रिका डार्क वेबवर लीक झाल्यामुळे शिक्षण मंत्रालयाने ही परीक्षाही पुढे ढकलली.

युजीसी-नेट परीक्षेत आता नव्या विषयाची भर… विषय कोणता, कधीपासून उपलब्ध?

यूजीसी नेट परीक्षा सहाय्यक प्राध्यापक, कनिष्ठ संशोधन फेलोशिप आणि भारतीय विद्यापीठातील पीएचडी कार्यक्रमांमध्ये नावनोंदणीसाठी पात्रता ठरवण्यासाठी जून आणि डिसेंबरमध्ये वर्षातून दोनदा आयोजित केले जाते.

 विद्यापीठ अनुदान आयोग राष्ट्रीय पात्रता परीक्षेत (युजीसी नेट) आता नव्या विषयाची भर पडणार आहे. डिसेंबरमध्ये होणाऱ्या परीक्षेत आपत्ती व्यवस्थापन विषयाचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. युजीसीचे सचिव प्रा. मनीष जोशी यांनी या बाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले. सहायक प्राध्यापक पदासाठी, संशोधन पाठ्यवृत्तीसाठी युजीसी नेट परीक्षा वर्षातून जून आणि डिसेंबर अशी दोनवेळा घेतली जाते. यंदापासून पीएच.डी.च्या प्रवेशासाठीही याच परीक्षेचे गुण ग्राह्य धरण्याचा निर्णय युजीसीने घेतला आहे. युजीसी नेट परीक्षेत सध्या ८३ विषय उपलब्ध आहेत. त्यात आता आपत्ती व्यवस्थापन विषयाचा समावेश करण्यात येणार आहे.