पीटीआय, नवी दिल्ली
वाढती लोकसंख्या, ते लोकांच्या प्रवासाच्या सवयी ते चुकीच्या उद्घोषणा… दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये किमान १८ जणांचा मृत्यू झाल्यानंतर त्यासाठी समाजमाध्यमांवर आणि इतरत्रही विविध कारणांचा उहापोह केला जात आहे. सरकारचे समर्थक या चेंगराचेंगरीबद्दल पीडितांना दोष देत आहेत, तर टीकाकार यासाठी सरकारी यंत्रणेला दोष देत आहेत.
या निमित्ताने लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी विधेयक मांडावे, त्यासाठी लांगूनचालनाचे राजकारण थांबवावे असेही समाज माध्यमावरील काही जणांनी सुचवले.
सरकारच्या समर्थकांचे तर्क
● वाढती लोकसंख्या जबाबदार
● लोकांना प्रवासाची शिस्त नाही
● लोकांना रेल्वेने केलेली उद्घोषणा समजली नाही, सार्वजनिक उद्घोषणा काळजीपूर्वक ऐकाव्यात
● लोकांनी प्राथमिक गर्दी व्यवस्थापनाचे नियम शिकावेत
● ग्रामीण भागातील लोक कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवून चेंगराचेंगरी सुरू करतात
सरकारच्या विरोधकांची टीका
● रेल्वेच्या व्यवस्थापनात त्रुटी
● रेल्वे स्थानकावर हजारो लोक असताना आवश्यक खबरदारीचा अभाव
● तासाभरात हजारो अनारक्षित तिकिटांची विक्री
● गर्दीचे नियंत्रण करणारे सुरक्षा रक्षक गायब
● प्रवाशांना अचूक माहिती देण्यासाठी कोणतेही विशेष प्रयत्न नाहीत