US Teacher Gets Impregnated With 13-Year-Old Student : अमेरिकेतील न्यू जर्सी येथे एका शिक्षिकेने अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. न्यू जर्सी येथील प्राथमिक शाळेतील शिक्षिका लॉरा कॅरॉन १३ वर्षांच्या विद्यार्थ्यापासून गर्भवती राहिली होती आणि त्यानंतर तिला एक मुलगाही झाला आहे. दरम्यान ही आरोपी शिक्षिका, पीडित विद्यार्थी ११ वर्षांचा असल्यापासून त्याच्याशी लैंगिक संबंध ठेवत असल्याचेही समोर आले आहे. केप मे काउंटी न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थी आणि शिक्षिका २०१६ ते २०२० दरम्यान शिक्षिकेच्या घरी एकत्र राहत होते आणि त्या काळात त्यांच्यात लैंगिक संबंध होते.
पीडित विद्यार्थी पाचवीत असताना आरोपी त्याची वर्गशिक्षिका होती. २००५ मध्ये जन्मलेला पीडित विद्यार्थी आणि त्याच्या कुटुंबीयांचे शिक्षिकेशी जवळचे संबंध होते. त्यामुळे पीडित विद्यार्थ्याच्या पालकांनी त्याला शिक्षिकेच्या घरी काही दिवस राहण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर २०१६ मध्ये पीडित विद्यार्थी तिथे कायमस्वरूपी राहायला गेला होता.
दरम्यान या प्रकरणी आता न्यू जर्सी प्राथमिक शाळेतील शिक्षिकेला, तिच्या घरी राहणाऱ्या १३ वर्षांच्या मुलाचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. पीडित विद्यार्थी सध्या १३ वर्षांचा आणि शिक्षिका २८ वर्षांची आहे.
शिक्षिका आणि विद्यार्थ्यामध्ये लैंगिक संबंध सुरू झाले तेव्हा शिक्षिका लॉरा कॅरॉन २६ वर्षांची आणि पीडित विद्यार्थी ११ वर्षांचा होता. नंतर ती विद्यार्थ्यापासून गर्भवती राहिली आणि २०१९ मध्ये तिने मुलाला जन्म दिला. जेव्हा कॅरॉन आई झाली तेव्हा ती २८ वर्षांची होती आणि मुलाचे वडील असलेला पीडित विद्यार्थी १३ वर्षांचा होता.
फेसबुक पोस्टमुळे समोर आले प्रकरण
दरम्यान विद्यार्थ्याच्या वडिलांनी शिक्षिकेची फेसबुक पोस्ट पाहिल्यानंतर शिक्षिकेच्या मुलाचे वडील कोण आहे, याचे रहस्य उलगडले. कारण विद्यार्थ्याच्या वडिलांना स्व:ता, त्यांचा मुलगा आणि शिक्षिकेच्या मुलामध्ये अनेक साधर्म्ये आढळली.
गेल्या महिन्यापर्यंत शिक्षिका आणि विद्यार्थी संपर्कात
या घटनेतील पीडित आता १८ वर्षांचा असून, त्याने शिक्षिकेबरोबरचे लैंगिक संबंध आणि मुलाचे बाप असल्याचे मान्य केले आहे. पीडित विद्यार्थ्याने असेही सांगितले की, शिक्षिका आणि तो गेल्या महिन्यापर्यंत संपर्कात होते.
या प्रकरणी शिक्षिका कॅरॉनला नुकतीच अटक करण्यात आली असून, तिच्यावर विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कॅरॉनला न्यायालयात हजेर करेपर्यंत केप मे काउंटी कारागृहात ठेवण्यात येणार आहे.च
© IE Online Media Services (P) Ltd