New Lady of Justice Statue In Supreme Court says Law Is Not Blind anymore : बऱ्याचदा आपण चित्रपटांमधील न्यायालयातील प्रसंगांमध्ये न्यायदेवतेचा (Lady of Justice) पुतळा पाहिला आहे. यामध्ये न्यायदेवतेच्या एका हातात तलवार, तर दुसऱ्या हातात तराजू दिसतो. तसेच या न्यायदेवतेच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली आपण पाहिली आहे. मात्र, आता न्यायालयांमध्ये न्यायदेवतेचा नवा पुतळा पाहायला मिळू शकतो. कारण, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांसाठीच्या ग्रंथालयातील न्यायदेवतेचा पुतळा (New Lady of Justice) बदलण्यात आला आहे. या पुतळ्यामध्ये काही बदल करण्यात आले आहेत. यापैकी प्रमुख बदल म्हणजे न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील पट्टी हटवण्यात आली आहे. तसेच तिच्या एका हातात तराजू तर दुसऱ्या हतात तलवारीऐवजी भारतीय संविधान दिसत आहे. ऑल इंडिया रेडिओ न्यूजने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील पट्टी हटवून न्यायदेवता अंध नाही/कायदा अंध नाही असा संदेश देण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच कायदा व्यवस्था भारतीय संविधानावर आधारित असल्याचं नमूद करण्यासाठी न्यायदेवतेच्या हातातील तलवारीची जागा आता भारतीय संविधानाने घेतली आहे.

हे ही वाचा >> Indian Airlines : तीन दिवसांत १२ विमानांना बॉम्बने उडवण्याची धमकी; केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री म्हणाले, “विघ्नकारी कृत्यांमुळे चिंता”

नव्या मूर्तीची वैशिष्ट्ये

  1. न्यायदेवतेची नवी मूर्ती पांढऱ्या शुभ्र रंगाची आहे.
  2. ही मूर्ती भारतीय वेशभूषेत आहे. साडी, डोक्यावर मुकूट, कपाळावर टिकली, कानात व गळ्यात पारंपरिक आभूषणं दिसत आहेत.
  3. न्यायदेवतेच्या एका हातात तराजू आणि दुसऱ्या हातात संविधान आहे.

जुन्या मूर्तीची वैशिष्ट्ये

आधी न्यायदेवतेच्या डोळ्यांवर पट्टी होती. ही पट्टी म्हणजे समानतेचं प्रतीक मानलं जात होती. याचाच अर्थ न्यायालयासमोर सर्वजण सारखेच आहेत. नेता, सेलिब्रेटी, श्रीमंत, गरीब असा भेदभाव न्यायदेवता करत नाही. तर हातातील तलवार ही गुन्हेगारांना शिक्षा देण्याची शक्ती दर्शवते.

हे ही वाचा >> Kamala Harris : “गांजामुळे कुणालाही शिक्षा होता कामा नये”, कमला हॅरीस यांचं गांजा कायदेशीर करण्याचं आश्वासन!

सरन्यायाधीशांच्या आदेशानंतर मूर्तीत बदल

एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या आदेशानुसार सर्वोच्च न्यायालयातील ग्रंथालयात नवी मूर्ती ठेवण्यात आली आहे. भारताने अलीकडेच ब्रिटीशकालीन इंडियन पीलन कोड कायद्यांमध्ये बदल करून भारतीय न्याय संहिता कायदा लागू केला आहे. न्यायदेवतेच्या मूर्तीमधील बदल हा त्याचाच एक भाग मानला जात आहे. भारतातील न्यायदेवतेच्या जुन्या मूर्तीची प्रेरणा ग्रीक संस्कृतीतून घेण्यात आली आहे. तिथल्या संस्कृतीत थेमिस ही न्यायाची देवता आहे. तिच्या एका हातात तराजू तर, दुसऱ्या हातात तलवार आहे. अनेक न्यायालयांमध्ये भारतीय व ग्रीक तत्त्वज्ञानानाचं मिश्रण करून तयार केलेली न्यायदेवतेची मूर्ती पाहायला मिळते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New lady of justice statue in supreme court law is not blind anymore message asc