राजधानीतील जुन्या महाराष्ट्र सदनातील कॅंटिन येत्या १५ दिवसांत पुन्हा सुरू होणार असून, त्यानंतर नव्या महाराष्ट्र सदनातील कॅंटिन बंद होण्याची शक्यता आहे.
महिला आर्थिक विकास महामंडळ या बचतगटाकडून सध्या नव्या महाराष्ट्र सदनात कॅंटिन सुविधा पुरविली जाते. ‘चपाती’ प्रकरणानंतर आयआरसीटीसीने नव्या महाराष्ट्र सदनातील सेवा बंद केल्यावर महिला आर्थिक विकास महामंडळ बचतगटाकडून सेवा पुरविण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र, राज्य सरकारने जुन्या महाराष्ट्र सदनात कॅंटिन सेवा देण्यासंदर्भात महिला आर्थिक विकास महामंडळाशी करार केला आहे. त्यामुळे येत्या १५ दिवसांत जुन्या सदनातील कॅंटिन सुरू झाल्यावर या बचतगटाकडून तिथे खानपान सेवा सुरू करण्यात येईल. त्यानंतर नव्या महाराष्ट्र सदनातील ही सेवा बंद करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्र सदनातील कॅंटिन चालविण्यासाठी एकाही मराठी व्यावसायिकाने उत्सुकता दाखविली नसल्याचे खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच सांगितले. या सदनातील कॅंटिन चालविणाऱयांसाठी घालण्यात आलेल्या अटी जाचक असल्याचे समजते. जुन्या महाराष्ट्र सदनात संबंधित व्यावसायिकाला केवळ एक लाख रुपये अनामत रक्कम म्हणून ठेवावे लागतात. मात्र, नव्या सदनातील कॅंटिनसाठी पाच लाख रुपये अनामत रक्कम ठेवण्याची अट घालण्यात आली आहे.

MHADA Konkan Board lottery Application sale-approval process extended by 15 days again
म्हाडा कोकण मंडळ सोडत : अर्ज विक्री-स्वीकृती प्रक्रियेला पुन्हा १५ दिवसांची मुदवाढ
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
fight for post of Guardian Minister has begun among three parties in mahayuti
पालकमंत्रीपदावरून आता रस्सीखेच
Thane District Towing Van, Towing Van issue,
ठाणे जिल्ह्यातील टोईंग व्हॅन बंद, शहरांमध्ये रस्तोरस्ती उभ्या केलेल्या वाहनांचा अडथळा
Union Cabinet did not approve and swap keeping building height restrictions in Juhu and dn Nagar
जुहू, डी एन नगरमधील इमारत उंचीवरील बंदीचा निर्णय प्रलंबित! ४०० हून अधिक इमारतींच्या पुनर्विकासाला फटका
Power supply in Karanjade Colony interrupted for over nine hours on Monday
करंजाडेवासीय ९ तास विजेविना
minister profile Chandrashekhar Bawankule Indranil Naik Adv Ashish Jaiswal
मंत्र्यांची ओळख : चंद्रशेखर बावनकुळे, इंद्रनील नाईक, ॲड. आशिष जयस्वाल
Maharashtra cabinet expansion
मंत्रिमंडळाचा आज विस्तार, नागपुरात शपथविधी; नावे गुलदस्त्यातच
Story img Loader