चिकुनगुन्या या रोगावर लस तयार करण्यासाठी वैज्ञानिकांनी एक नवीन पद्धत यशस्वी केली आहे. फ्रान्सच्या मार्सेली येथील इमर्जिग व्हायरसेस विभागाने  सिडनी विद्यापीठाबरोबर हे संशोधन केले आहे. यात तयार करण्यात आलेल्या विषाणूची  पुनरावृत्ती करण्याची क्षमता आहे. त्यामुळे त्याचा वापर लशीसाठी करता येणार आहे. गेल्या दशकभरातील काळात लाखो लोकांना चिकव्हीमुळे चिकुनगुन्यास तोंड द्यावे लागले त्यामुळे या रोगावर लस तयार करण्याची तातडीने गरज आहे. चिकव्ही विषाणूचा वाहक असलेला एडीस अल्बोपिक्टस हा डास सध्या नवीन भागात पसरला आहे त्यात इटलीसारखे काही भाग असे आहेत जेथे हा रोग अगोदर नव्हता. कोडॉन एनकोिडग पद्धतीचा वापर करून अँटोनी नौगेरीड व त्यांच्या सहकाऱ्यांनी चिकुनगुन्याच्या विषाणूच्या प्रथिनांची संकेतावली न बदलता केवळ न्युक्लिइक अ‍ॅसिडच्या रचनेत बदल करून एक वेगळाच विषाणू तयार केला होता. पोलिओ विषाणू व इन्फ्लुएंझा विषाणू यांच्यात कोडॉॅन रिएनकोिडग पद्धत वापरण्यात आली होती त्यातही विषाणूची पुनरावृत्ती क्षमता कमी झाली होती. प्राण्यांमध्ये त्याचे प्रयोग यशस्वी झाले विषाणूची क्षमता कमी करण्याचा प्रयत्न त्यात केला आहे, नवीन प्रकारच्या लशी तयार करण्यासाठी कोडॉन रिएनकोडिंग पद्धतीचा वापर केला जाऊ शकतो पण त्यासाठी प्रत्येक रोगकारक जंतूचा जनुकीय क्रम माहित असणे आवश्यक आहे असे पीएलओएस पॅथोजेन्स या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधात म्हटले आहे.

विदर्भात १० महिन्यांत २२८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या – पवार
नवी दिल्ली – जानेवारी महिन्यात संपलेल्या १० महिन्यांत विदर्भातील २२८ शेतकऱ्यांनी शेतीच्या झालेल्या दुर्दशेला कंटाळून आत्महत्या केली, असे गुरुवारी संसदेत स्पष्ट करण्यात आले. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी ही माहिती राज्यसभेत एका लेखी उत्तरात दिली आहे. तथापि, शेतीच्या दुर्दशेला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे, असेही पवार म्हणाले. २००६ मध्ये आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ५५६ होती ती २०११ मध्ये ३४६ इतकी झाली. संपूर्ण महाराष्ट्रात २००६ मध्ये हीच संख्या १०३५ इतकी होती ती २०११ मध्ये ४८५ इतकी झाली, असेही कृषिमंत्री म्हणाले.