प्राप्तिकर खात्याने आता पॅनकार्डची किंमत वाढवली असून ते आता १०५ रुपयांना पडेल.प्राप्तिकर विभागाने अलीकडेच व्यक्तिगत तपासणी व संबंधित माहिती यांची पडताळणी करण्यासाठी हे दर वाढवले आहेत. बनावट व अनेक पॅनकार्ड असणे या समस्या दूर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन पॅन कार्डसाठी आता सर्व करांसहित १०५ रुपये आकारले जाणार आहेत त्यात सेवाकर बदललेला नाही. पत्ता, जन्मतारीख याबाबतची कागदपत्रे खरी आहेत की नाहीत याची पडताळणी, खोटय़ा पॅनकार्डच्या तक्रारी व एकाच व्यक्तीच्या नावावर अनेक पॅनकार्ड असणे याबाबतच्या तक्रारींची छाननी यासाठी किंमत वाढवण्यात आली आहे. व्यक्ती व इतर कुणालाही पॅनकार्ड हवे असेल तर त्यांना अर्जासोबत जन्मतारीख, ओळख सिद्ध करणारी कागदपत्रे देणे आवश्यक असते. यात मूळ कागदपत्रे लगेच तपासणीनंतर अर्जदारांना परत केली जातात ही कागदपत्रे अर्जदाराने सही करून स्वसाक्षांकित केलेली असतात.
नवीन पॅनकार्डची किंमत १०५ रुपये
प्राप्तिकर खात्याने आता पॅनकार्डची किंमत वाढवली असून ते आता १०५ रुपयांना पडेल.प्राप्तिकर विभागाने अलीकडेच व्यक्तिगत तपासणी व संबंधित माहिती यांची पडताळणी करण्यासाठी हे दर वाढवले आहेत.
First published on: 29-01-2014 at 01:48 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New pan card to cost rs 105 including taxes