New Parliament Building Inauguration by PM Modi Live Updates , 28 May 2023: गेल्या काही दिवसांपासन चर्चेत असणाऱ्या नव्या संसद भवनाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन पार पडलं. या उद्घाटनाला भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि इतर महत्त्वाची नेतेमंडळी उपस्थित होती. देशातील अनेक विरोधी पक्षांनी या उद्घाटनाला विरोध केला असून काहींनी बहिष्कारही घातला होता.

Live Updates

Prime Minister Narendra Modi will Inaugurate New Parliament Building: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नव्या संसद भवनाचं उद्घाटन!

18:18 (IST) 28 May 2023
New Parliament Building Inauguration: नव्या संसदेतील नक्षीकाम आणि त्यामागची प्रेरणा!

नव्या संसद भवनातील समुद्र मंथन थीममागची संकल्पना काय होती? ऐका थेट नरेश कुमावत यांच्याचकडून!

https://twitter.com/ANI/status/1662782515004964865

18:13 (IST) 28 May 2023
जवाहरलाल नेहरूंचा फोटो ट्वीट करत काँग्रेस व भाजपामध्ये रंगला कलगीतुरा!

नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यानंतर काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षामध्ये एकमेकांवर टीका-टिप्पणी केली जात आहे.

वाचा सविस्तर

16:18 (IST) 28 May 2023
New Parliament Building Inauguration: स्वरा भास्करचं ट्वीट...!

हे बघा, याचसाठी आपण मतदानातून यांना निवडून दिलं होतं... स्वरा भास्करनं ट्वीट केले दोन फोटो!

https://twitter.com/ReallySwara/status/1662749590293028865

16:16 (IST) 28 May 2023
New Parliament Building Inauguration: मोदींनी बोलावली भाजपाच्या मुख्यमंत्र्यांची बैठक

नव्या संसद भवनाचं उद्घाटन केल्यानंतर मोदींनी बोलावली भाजपाच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक

https://twitter.com/ANI/status/1662764093567283200

16:08 (IST) 28 May 2023
New Parliament Building Inauguration: शवपेटीशी संसदेची तुलना करणाऱ्या ट्वीटवर तेजस्वी यादव म्हणतात....

राजदच्या अधिकृत संकेतस्थळावर नव्या संसद भवनाची तुलना शवपेटीशी करणारं ट्वीट करण्यात आलं होतं. त्यावर बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

https://twitter.com/ANI/status/1662761898469728258

16:03 (IST) 28 May 2023
New Parliament Building Inauguration: देवेंद्र फडणवीसांनी शेअर केला सेंगोलबाबतचा व्हिडीओ

देवेंद्र फडणवीसांनी शेअर केला सेंगोलचं महत्त्व सांगणारा संसदेतील व्हिडीओ!

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1662756826079965186

14:58 (IST) 28 May 2023
New Parliament Building Inauguration: विनेश फोगाट आंदोलनात, बबिता फोगाटची संसद भवनावर पोस्ट!

एकीकडे विनेश फोगाटसह आंदोलन करणाऱ्या महिला कुस्तीपटूंची पोलिसांनी दिल्लीत धरपकड केली असताना दुसरीकडे तिची बहीण बबिता फोगाटनं नव्या संसद भवनाच्या उद्घाटनानिमित्ताने गर्व वाटत असल्याचं ट्वीट केलं आहे.

https://twitter.com/BabitaPhogat/status/1662495541631266822

14:44 (IST) 28 May 2023
New Parliament Building Inauguration: पूजा भट्टचं सूचक ट्वीट!

पुरुष संतांना आदरानं संसदेत नेण्यात आलं. महिला कुस्तीपटूंना रस्त्यावर धक्काबुक्की करण्यात आली. आनंद? दु:ख? गर्व? शरम? आपल्याला या क्षणी नेमकं काय वाटायला हवं? - अभिनेत्री-चित्रपट निर्माती पूजा भट्ट

https://twitter.com/PoojaB1972/status/1662718132375662592

14:41 (IST) 28 May 2023
New Parliament Building Inauguration: काँग्रेसला चांगल्या गोष्टी सहन होत नाहीत - प्रल्हाद जोशी

काँग्रेसला देशात घडणाऱ्या चांगल्या गोष्टी सहनच होत नाहीत - संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी

https://twitter.com/ANI/status/1662735405597478914

13:45 (IST) 28 May 2023
New Parliament Building Inauguration: पंतप्रधानांमध्ये सर्व सद्गुण: कामाची दसर स्वामी

अविनाश मठाच्या महंतांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमनं!

https://twitter.com/ANI/status/1662685563760295936

13:42 (IST) 28 May 2023
New Parliament Building Inauguration: अमोल मिटकरींचं खोचक ट्वीट

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी केलेल्या खोचक ट्वीटमधून नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावर टीका करण्यात आली आहे.

https://twitter.com/amolmitkari22/status/1662729567650422784

13:32 (IST) 28 May 2023
New Parliament Building Inauguration: नव्या भवनात अत्याधुनिक तंत्रज्ञान

नव्या संसद भवनात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे - नरेंद्र मोदी

https://twitter.com/ANI/status/1662730706643222529

13:30 (IST) 28 May 2023
New Parliament Building Inauguration:

पंचायत भवन ते संसद भवन, या प्रत्येक ठिकाणी आपली प्रेरणा ही देशाच्या आणि नागरिकांच्या विकासाची आहे - नरेंद्र मोदी

https://twitter.com/ANI/status/1662729576009854976

13:27 (IST) 28 May 2023
New Parliament Building Inauguration: जेव्हा आपण प्रामाणिकपणे जबाबदाऱ्या पार पाडू... - नरेंद्र मोदी

या संसदेत जे लोकप्रतिनिधी बसतील, ते नव्या प्रेरणेनं लोकशाहीला नवी दिशा देण्याचा प्रयत्न करतील. आपल्याला देश सर्वात आधी, या भावनेनं पुढे वाटचाल करावी लागेल. आपल्याला कर्तव्यपथाला सर्वोच्च स्थान द्यावं लागेल. आपल्याला आपल्या कामगिरीतून उदाहरण सादर करावं लागेल. आपल्याला सातत्याने स्वत:मध्ये सुधारणा करावी लागेल. आपल्याला नवे रस्ते स्वत:लाच बनवावे लागतील. स्वत:ची झीज करावी लागेल. लोककल्याणालाच आयुष्याचा मंत्र बनवावा लागेल. जेव्हा संसदेत आपण आपल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडू, तेव्हा देशवासीयांनाही नवी प्रेरणा मिळेल - नरेंद्र मोदी

https://twitter.com/ANI/status/1662726962803245056

13:24 (IST) 28 May 2023
New Parliament Building Inauguration:

यशस्वी होण्याची पहिली अट यशस्वी होण्याचा विश्वास हीच असते - नरेंद्र मोदी

13:22 (IST) 28 May 2023
New Parliament Building Inauguration: अमृतकाळ देशाच्या इतिहासातला महत्त्वाचा टप्पा - नरेंद्र मोदी

१५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून मी सांगितलं होतं.. यही समय है, सही समय है. प्रत्येक देशाच्या इतिहासात अशी वेळ येते की जेव्हा देशाची चेतना नव्याने जागृत होत असते. स्वातंत्र्याच्या २५ वर्षं आधी अशीच वेळ आली होती. गांधीजींच्या असहकार आंदोलनाने संपूर्ण देशाला भारून टाकलं होतं. प्रत्येक भारतीयाला जोडलं होतं. या सगळ्याचा परिणाम आपण १९४७ साली स्वातंत्र्यामध्ये पाहिला. स्वातंत्र्याचा अमृतकाळही भारताच्या इतिहासातला असाच टप्पा आहे - नरेंद्र मोदी

13:17 (IST) 28 May 2023
New Parliament Building Inauguration: ...म्हणून नव्या संसद भवनाचं बांधकाम केलं - नरेंद्र मोदी

संसदेच्या जुन्या भवनात सगळ्यांसाठी आपली कामं पूर्ण करणं फार कठीण होतं. तंत्रज्ञान, बसण्याच्या जागा यासंदर्भात अनेक अडचणी होत्या. गेल्या दीड-दोन वर्षांपासून ही चर्चा सातत्याने होत होती की देशाला नव्या संसद भवनाची गरज आहे. येणाऱ्या वर्षांमध्ये खासदारांची संख्या वाढली असती. मग ते कुठे बसले असते? त्यामुळेच ही काळाची गरज होती की संसदेच्या नव्या इमारतीचं बांधकाम केलं जावं. मला आनंद आहे की ही नवी इमारत अत्याधुनिक सुविधांनी सज्ज आहे. या वेळेलाही या सभागृहात सूर्याचा प्रकाश थेट येत आहे. वीजेचा अत्यल्प वापर व्हावा याचीही काळजी घेण्यात आली आहे - नरेंद्र मोदी

https://twitter.com/ANI/status/1662728613291245568

13:14 (IST) 28 May 2023
New Parliament Building Inauguration:

लोकसभेची अंतर्गत रचना राष्ट्रीय पक्षी मोरावर आधारित आहे. राज्यसभेची अंतर्गत रचना राष्ट्रीय फूल कमळावर आधारित आहे. संसदेच्या अंगणात राष्ट्रीय फळाचंही झाड आहे. या संसदेत राजस्थानहून आणलेले ग्रेनाईट्स आणले आहेत. लाकूड महाराष्ट्रातून आलंय. उत्तर प्रदेशच्या कारागीरांनी आपल्या हातांनी कारपेटवर नक्षीकाम केलंय. यातून एक भारत, श्रेष्ठ भारतचं खऱ्या अर्थाने दर्शन होतंय - नरेंद्र मोदी

https://twitter.com/ANI/status/1662726962803245056

13:13 (IST) 28 May 2023
Video : जंतर-मंतरवर ‘दंगल’, नव्या संसद भवनाच्या दिशेने जाणाऱ्या कुस्तीगीरांना पोलिसांनी रोखलं, दिल्लीत सुरक्षा वाढवली!

नव्या संसद भवनाचं आज उद्घाटन होत असताना कुस्तीगीरांनी तिथेच महापंचायत भरवण्याचा निश्चय केला होता. पंरतु, त्यांचा हा निश्चय पोलिसांनी हाणून पाडला असून नव्या संसद भवनाच्या दिशेने जाणाऱ्या काही कुस्तीगीरांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे जंतर मंतर ते नव्या संसद भवनाच्या मार्गावर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून येथील परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे.

सविस्तर वाचा

13:12 (IST) 28 May 2023
New Parliament Building : नव्या संसद भवनाचे उद्घाटन होताच राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राज्याभिषेक…”

नव्या संसद भवनाचे उद्घाटन होताच बहिष्कार नोंदवलेल्या विरोधकांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्यांनी ट्विट करत अवघ्या दोन ओळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र डागलं.

सविस्तर वाचा

13:10 (IST) 28 May 2023
New Parliament Building Inauguration: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हणून दाखवल्या कवितेच्या चार ओळी!

"अमृतकाळाचं आवाहन आहे..

मुक्त मातृभूमीको नवीन प्राण चाहिये

नवीन पर्व के लिये, नवीन प्राण चाहिये

मुक्त गीत हो रहा, नवीन राग चाहिये

नवीन पर्व के लिये, नवीन प्राण चाहिये

इसीलिये इस कार्यस्थली को भी उतनाही नवीन होना चाहिये"

https://twitter.com/ANI/status/1662726125406289926

13:08 (IST) 28 May 2023
New Parliament Building Inauguration: जो थांबतो, त्याचं भाग्यही थांबतं - नरेंद्र मोदी

जो थांबतो, त्याचं भाग्यही थांबतं. जो चालत राहातो, त्याचंच भाग्य पुढे सरकत राहातं, यशाच्या शिखरावर जातं. त्यासाठी चालत राहा. गुलामीच्या नंतर भारतानं खूप काही गमावून आपला नवा प्रवास सुरू केला होता. ती यात्रा कितीतरी चढ-उतारांनंतर, अडचणी पार करत स्वातंत्र्याच्या अमृतकाळात प्रवेश करती झाली आहे - नरेंद्र मोदी

13:04 (IST) 28 May 2023
New Parliament Building Inauguration: हे आपलं भाग्य आहे की... - नरेंद्र मोदी

मला वाटतं की हे आपलं भाग्य आहे की या पवित्र सेंगोलला आपण त्याचं वैभव, मान पुन्हा परत देऊ शकलो आहोत. जेव्हा या संसदेत कार्यवाही सुरू होईल, तेव्हा हे सेंगॉल आपल्या सगळ्यांना प्रेरणा देत राहील - नरेंद्र मोदी

https://twitter.com/ANI/status/1662724110420705280

13:03 (IST) 28 May 2023
New Parliament Building Inauguration: नरेंद्र मोदींनी सांगितलं सेंगोलचं महत्त्व...

संसदेच्या नव्या इमारतीत पवित्र सेंगोलचीही स्थापना झालीये. महान चोल साम्राज्यात सेंगोलला कर्तव्यपथ, राष्ट्रपथचं प्रतीक मानलं जात होतं. राजाजी आणि आदिनमच्या संतांच्या मार्गदर्शनाखाली हेच सेंगोल सत्तेच्या हस्तांतरणाचं प्रतीक बनलं होतं. तमिळनाडूहून आलेले आदिनमचे संत संसद भवनात आम्हाला आशीर्वाद द्यायला उपस्थित होते. त्यांच्याच मार्गदर्शनात लोकसभेत हे संगोल स्थापित झालं आहे - नरेंद्र मोदी

https://twitter.com/ANI/status/1662724274657038336

13:02 (IST) 28 May 2023
New Parliament Building Inauguration: जेव्हा भारताचा विकास होतो, तेव्हा जगाचा विकास होतो - नरेंद्र मोदी

आज पुन्हा एकदा अवघं जग भारताला, भारताच्या संकल्पाच्या दृढतेला, भारतीयांच्या प्रखरतेला आदर आणि अपेक्षेने पाहात आहे. जेव्हा भारताचा विकास होतो, तेव्हा जगाचा विकास होतो. संसदेचं हे नवीन भवन भारताच्या विकासापासून जगाच्या विकासाचंही आवाहन करेल - नरेंद्र मोदी

https://twitter.com/ANI/status/1662723359887757312

13:00 (IST) 28 May 2023
New Parliament Building Inauguration: आजचा दिवस अमर - नरेंद्र मोदी

प्रत्येक देशाच्या विकासाच्या प्रवासात काही क्षण हे अमर होऊन जातात. आज भारतासाठी २८ मे हा असाच एक दिवस आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी

https://twitter.com/ANI/status/1662722671212376070

12:59 (IST) 28 May 2023
New Parliament Building Inauguration: ७५ रुपयांच्या नाण्याचं उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ७५ रुपयांच्या नाण्याचं लोकार्पण करण्यात आलं.

https://twitter.com/ANI/status/1662722114754088961

12:58 (IST) 28 May 2023
New Parliament Building Inauguration: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाला सुरुवात

मी सर्व देशवासीयांना या सुवर्ण क्षणांच्या शुभेच्छा देतो - नरेंद्र मोदी

https://twitter.com/ANI/status/1662721755809734657

12:36 (IST) 28 May 2023
New Parliament Building Inauguration: राहुल गांधींचं खोचक ट्वीट

नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावर राहुल गांधींचं खोचक ट्वीट; म्हणाले, "संसद लोकांचा आवाज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनाच्या उद्घाटनाला राज्याभिषेक समजत आहेत"

https://twitter.com/RahulGandhi/status/1662711995660107778

12:32 (IST) 28 May 2023
New Parliament Building Inauguration: पंतप्रधान मोदी संसदेत येताच 'मोदी-मोदी'च्या घोषणा!

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नव्या संसदेच्या लोकसभेत आगमन होताच उपस्थित खासदारांनी मोदी-मोदीच्या घोषणा दिल्या.

https://twitter.com/ANI/status/1662713762040930304

New Parliament Building Inauguration Updates

नवीन संसद भवन उद्घाटन / सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प (फोटो - लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Prime Minister Narendra Modi will Inaugurate New Parliament Building: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नव्या संसद भवनाचं उद्घाटन!

Story img Loader