New Parliament Building Inauguration by PM Modi : भारताच्या नव्या संसदेवरून गदारोळ निर्माण झाला आहे. नव्या संसदेच्या उद्घाटनाकरता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आमंत्रण न मिळाल्याने देशातील विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. नव्या संसद भवनावरून राजकीय वाद निर्माण झालेला असातना संसदेच्या नव्या रुपाबाबतही जोरदार चर्चा होत आहे. नव्या भवनाचे समोर आलेल्या फोटोंनुसार हे भवन भव्य आणि षटकोनी असल्याचं दिसतंय. तसंच, राज्यसभेच्या हॉलमध्ये लाल रंगाचे कारपेट तर, लोकसभेच्या सभागृहात हिरव्या रंगाचे कारपेट अंथरल्याचेही स्पष्ट दिसतंय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कारपेटची ही व्यवस्था संसदेत नवी नाही. जुन्या संसदेतही अशीच कारपेट रचना होती. जुन्या संसद भवनातील लोकसभा सभागृहातही हिरव्या रंगाचे कारपेट तर, राज्यसभा सभागृहात लाल रंगाचे कारपेट होते. ही रचना नव्या संसद भवनातही बदलण्यात आलेली नाही. नव्या संसदेत बरेच बदल करण्यात आले आहेत. परंतु, कारपेटबाबत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पण या रंगांमागची गोष्ट तुम्हाला माहितेय का? हे रंग बदलले का जात नाहीत? याविषयी आज जाणून घेणार आहोत.

हेही वाचा >> नव्या संसदेच्या उद्घाटनाचा वाद आता सर्वोच्च न्यायालयाच्या दारी, जनहित याचिकेतून केली ‘ही’ मागणी

संसदेच्या दोन्ही सभागृहांचे वेगवेगळे महत्त्व आहेत. दोन्ही सभागृहात निवडून जाण्यासाठी निवड प्रक्रियाही वेगवेगळी असते. लोकसभेचे सदस्य थेट जनतेतून निवडले जातात. तर, राज्यसभेचे सदस्य लोकप्रतिनिधींकडून निवडले जातात. लोकसभेचे सदस्य जनतेचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे जमिनीशी जोडले गेल्याचे प्रतिक म्हणून लोकसभेत हिरव्या रंगाचे कारपेट अंथरले जाते. जमिनीला म्हणजेच कृषीला या रंगाशी जोडलं गेलं आहे.

राज्यसभेतील खासदार हे इतर लोकप्रतिनिधींमार्फत निवडले जातात. राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी वेगळी निवड प्रक्रिया राबवली जाते. लाल रंग हे शाही अभिमानाचे प्रतिक आहे. राज्यसभेतील सदस्यांना स्पेशल सदस्य मानले जाते. त्यामुळे राज्यसभेत लाल रंगाचे कारपेट अंथरलेले असते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New parliament building why is there green carpet in lok sabha and red carpet in rajya sabha sgk