कर्करोगाच्या पेशींचा सुनियंत्रित मृत्यू घडवण्यात उपयोगी ठरेल अशी एक युक्ती वैज्ञानिकांनी शोधून काढली आहे. त्यामुळे कर्करोगाला शरीरातूनच विरोध होईल अशी व्यवस्था करणे शक्य आहे. विशेष म्हणजे या संशोधनात एका भारतीय वंशाच्या वैज्ञानिकाचा सहभाग आहे. अ‍ॅपॉटटॉसिस या क्रियेत नैसर्गिकरित्या पेशींचा मृत्यू होत असतो त्यामुळे शरीरातील अनावश्यक पेशी नष्ट होतात त्यामुळे कर्करोग होत नाही पण अ‍ॅपॉटॉसिस क्रिया बंद पडली तर पेशी प्रमाणाबाहेर वाढून कर्करोग होतो. किंवा प्रतिकारशक्ती पेशी अयोग्यपद्धतीने शरीरावर हल्ला करतात. बाक नावाचे एक प्रथिन अ‍ॅपॉटॉसिस क्रियेत महत्वाचे ठरत असते ते आरोग्यपूर्ण पेशीत निष्क्रिय अवस्थेत असते. जेव्हा पेशीला मरण्याचा संदेश मिळतो तेव्हा या प्रथिनात बदल होऊन ते पेशीला मारते. ऑस्ट्रेलियातील वॉल्ट अँड एलिझा हॉल इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल रीसर्च या संस्थेच्या वैज्ञआनिकांनी बाक प्रथिन क्रियाशील करण्याची युक्ती शोधली आहे. या संशोधनात भारतीय वंशाच्या श्वेता अय्यर यांचाही सहभाग आहे. या संशोधकांनी एक प्रतिपिंद असे जे बाक प्रथिनाशी जोडले जाऊन त्याला क्रियाशील करते. त्यातून नवी उपचार पद्धती शक्य होईल असे रूथ क्लक यांनी सांगितले. या संशोधनातून कर्करोगावर नवी औषधे शक्य असते. बाक प्रथिनाला क्रियाशील करणारे औषध शोधण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. या शोधामुळे नवीन उपचारपद्धतीचा एक आरंभबिंदू सुरू झाला असे अय्यर यांनी सांगितले. यात संशोधकांनी बाक नावाच्या या प्रथिनाची त्रिमिती रचना तयार करून त्यात प्रतिपिंडाने ते कसे कार्यान्वित होते याचा अभ्यास केला. बाक हे प्रथिन बीएच ३ या प्रथिनाने कार्यान्वित होते. ते प्रथिन बाक या प्रथिनाच्या कुठल्याही भागावर जाऊन चिकटले तरी फायदा होतो. बीएच ३ प्रथिनाची नक्कल करणारी औषधे शोधून यात कर्करोग पेशींना मारणे शक्य होणार आहे. यात कर्करोगावर चांगल्या पद्धतीने इलाज करणे शक्य होणार आहे. कारण यात औषधांना पेशीकडून प्रतिरोध होणार नाही असे क्लक यांचे मत आहे.या प्रतिपिंडाच्या मदतीने पेशीतील बाक प्रथिनाला कार्यान्वित करणारी औषधे तयार केली जातील, नेचर कम्युनिकेशन या नियतकोलिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

Story img Loader