केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी १ फेब्रुवारीला देशाचं बजेट सादर केलं. त्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात भरघोस तरतुदी करण्यात आल्या आहेत. मुंबई दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा आपल्या भाषणात या अर्थसंकल्पाचं कौतुक केलं. तसंच युपीएच्य काळात दोन लाखांवरच्या उत्पन्नावर कर लागत होता आम्ही ती मर्यादा सात लाखांपर्यंत वाढवली आहे असंही त्यांनी सांगितलं. याच नव्या कर प्रणाली विषयी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

काय म्हटलं आहे निर्मला सीतारमण यांनी?

अर्थसंकल्पात आपण जी नवी कर प्रणाली लागू केली त्यामुळे सामान्य करदात्यांच्या हातात जास्त पैसा राहिल असं आता निर्मला सीतारमण यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी जो जुनाच अर्थसंकल्प वाचल्याबद्दल त्यांच्यावरही निर्मला सीतारमण यांनी टीका केली. चूक होऊ शकते मलाही मान्य आहे. पण देव करो अशी चूक कुणाकडूनच न होवो असंही त्या म्हणाल्या.

Guardian Minister Controversy
Manikrao Kokate : पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार? अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आता निर्णय…”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Devendra Fadnavis and Divija Fadnavis
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांकडून लेक दिविजाचं तोंडभरून कौतुक; हुशारीचं वर्णन करताना म्हणाले, “तिच्यातील प्रगल्भता…”
Hasan Mushrif
Hasan Mushrif : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत हसन मुश्रीफ यांचं विधान चर्चेत; म्हणाले, “आता पुढील निवडणुकीच्या…”
Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis
Vijay Wadettiwar : ‘देवेंद्र फडणवीसांनी आता नरेंद्र मोदींचं वारसदार व्हावं’, विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान
Devendra Fadnavis should become heir of pm Narendra Modi and lead country says vijay wadettiwar
मोदींचे वारसदार होऊन देशाचे नेतृत्व करा… वडेट्टीवारांच्या फडणवीसांवरील स्तुतीसुमनांमुळे…
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “आयुष्यात कधीच अंमली पदार्थाला स्पर्श केला नाही, कुणाची हिंमतही…”, देवेंद्र फडणवीसांनी काय सांगितलं?
Santosh Deshmukh Murder Case
Devendra Fadnavis : संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; ‘या’ मुद्द्यांवर झाली चर्चा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पीय भाषणामध्ये जुन्या आणि नव्या करप्रणालीसाठी वेगवेगळ्या घोषणा केल्या आहेत. यानुसार, नवीन करप्रणाली नागरिकांना लागू करण्यात आली असून जुनी करप्रणाली स्वीकारण्याचा पर्याय नागरिकांना उपलब्ध असणार आहे. अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेनुसार नव्या करप्रणालीमध्ये कमाल करपात्र उत्पन्नाची मर्यादा ५ लाखांवरून ७ लाख करण्यात आली आहे.त्यामुळे नवीन करप्रणालीचा स्वीकार करणाऱ्या करदात्यांना ७ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही. यासोबतच नव्या घोषणेनुसार कररचनेचे स्लॅब्सही बदलण्यात आले आहेत.

कसे असतील नव्या कररचनेतील टप्पे?

० ते ३ लाखांपर्यंतचं उत्पन्न – कोणताही कर नाही
३ ते ६ लाखांपर्यंतचं उत्पन्न – ५ टक्के कर
६ ते ९ लाखांपर्यंतचं उत्पन्न – १० टक्के कर
९ ते १२ लाखांपर्यंतचं उत्रन्न – १५ टक्के कर
१२ ते १५ लाखांपर्यंतचं उत्पन्न – २० टक्के
१५ लाखांहून जास्त उत्पन्न – ३० टक्के

या नव्या करप्रणालीमुळे लोकांच्या हाती जास्त पैसे राहतील असंही निर्मला सीतारमण यांनी स्पष्ट केलं आहे. पीटीआयने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

Story img Loader