जगभरात भूकंपाच्या घटना वाढू लागल्या आहेत. अलिकडेच टर्की आणि सीरियात झालेल्या महाप्रलयकारी भूकंपाने ४० हजारांहून अधिक लोकांचा बळी घेतला. तसेच काही दिवसांपूर्वी न्यूझीलंडही भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला होता. या देशाने एका महिन्याच्या अंतराने आणखी एक भूकंप पाहिला आहे. आज सकाळी पुन्हा एकदा न्यूझीलंडमध्ये ७.३ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के बसले. भूकंपाच्या तीव्रतेची माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने दिली आहे. अद्याप या भूकंपाने झालेल्या नुकसानाची माहिती मिळालेली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एनसीएसने दिलेल्या माहितीनुसार, न्यूझीलंडच्या उत्तर-पूर्वेला असलेल्या कर्माडेक बेटावर आज (२४ एप्रिल) सकाळी ६.११ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. मात्र, आतापर्यंत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही.

गेल्या महिन्यात देखील न्यूझीलंड भूकंपांच्या धक्क्यांनी हादरला होता. तेव्हा येथील कर्माडेक बेटांवर ७.१ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचे धक्के बसले होते.

दरम्यान, भूकंपानंतर यूएस त्सुनामी वॉर्निग सिस्टिमने (अमेरिकन त्सुनामी इशारा प्रणाली) त्सुनामीचा धोका वर्तवला आहे.

हे ही वाचा >> “मविआ म्हणून लढण्याची इच्छा आहे, पण फक्त…”, शरद पवारांचं सूचक विधान; आघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह?

नैसर्गिक आपत्तींमध्ये वाढ

बिघडत चाललेली इकोसिस्टम आणि मानवाच्या चुकांमुळे हवामानात निर्माण झालेला असमतोल यामुळे पृथ्वीवरील नवीन आव्हाने दिवसेंदिवस वाढत आहेत. तापमानात वाढ होणं, हिमनद्या वितळणं, अवकाळी पाऊस, मान्सूनच्या पाऊस कमी होणं, विनाशकारी पूर आणि भूकंपात वाढ होणे असे बदल आपण अलिकडच्या काळात पाहत आहोत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New zealand 7 3 magnitude earthquake hits kermadec islands tsunami threat asc
Show comments