न्यूझीलंडच्या न्याय मंत्री ज्युडिथ कॉलिन्स यांनी एका वादग्रस्त ब्लॉगरशी असलेल्या कथित वादग्रस्त संबंधावरून राजीनामा दिला. न्यूझीलंडमध्ये तीन आठवडय़ांनी सार्वत्रिक निवडणुका होत असताना त्यांनी हे पाऊल उचलले.
न्यूझीलंडचे पंतप्रधान जॉन के यांची पुन्हा तिसऱ्यांदा सत्ता येण्यावर त्यामुळे परिणाम होईल. ज्युडिथ कॉलिन्स यांचा राजीनामा हा आपला विजय असल्याचा दावा विरोधी पक्षांनी केला आहे.
ज्युडिथ या के यांच्या मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्री होत्या व भावी पंतप्रधान म्हणून त्यांचे नाव घेतले जात होते. न्यूझीलंडचे मुक्त पत्रकार व कार्यकर्ते निकी हॅगर यांनी त्यांचे ब्लॉगर कॅमेरून स्लॅटर यांच्याशी नेमके काय संबंध होते याची माहिती ‘डर्टी पॉलिटिक्स’ या पुस्तकात प्रथमच दिली होती. डर्टी पॉलिटिक्स या पुस्तकासाठी ब्लॉगर स्लॅटर यांच्या व्हेल ऑईल ब्लॉगवरील इमेल्स हॅक करण्यात आले होते. या ब्लॉगच्या आधारे स्लॅटर यांनी विरोधकांवर टीका केली होती. पंतप्रधान जॉन के यांनी मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या घोषणेत या पुस्तकाचा उल्लेख केला नाही.
न्यूझीलंडच्या न्याय मंत्री ज्युडिथ कॉलिन्स यांचा राजीनामा
न्यूझीलंडच्या न्याय मंत्री ज्युडिथ कॉलिन्स यांनी एका वादग्रस्त ब्लॉगरशी असलेल्या कथित वादग्रस्त संबंधावरून राजीनामा दिला.
First published on: 31-08-2014 at 03:21 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New zealand justice minister resigns amid scandal