New Zealand sacks ambassador to UK over criticizing donald trump : ब्रिटनमधील न्यूझीलंडचे राजदूत फिल गॉफ यांना पदावरून हटवण्यात आले आहे. गॉफ यांनी बुधवारी लंडन येथे एका चर्चेदरम्यान दुसर्‍या महायुद्धाबद्दलच्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ज्ञानावर प्रश्न उपस्थित केले होते. गॉफ यांच्या वक्तव्यानंतर न्यूझीलंडचे परराष्ट्र मंत्री विंस्टन पीटर्स यांनी त्यांची स्थिती अस्थिर असल्याचे सांगत त्यांना परत बोलावले आहे. दरम्यान गॉफ यांनी याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. गॉल्फ हे न्यूझीलंडचे वरिष्ठ राजनैतिक अधिकारी आहेत. गॉफ हे यापूर्वी परराष्ट्र मंत्री आणि ऑकलंडचे महापौर देखील राहिले आहेत.

फिल गॉफ यांनी रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या भूमिकेची तुलना ही १९३८ सालच्या म्यूनिक कराराशी केली होती, ज्यामुळे अडॉल्फ हिटलरला चेकोस्लोवाकिया ताब्यात घेण्याचा मार्ग खुला झाला होता. गॉफ यांनी विंस्टन चर्चिल यांनी या करारावर टीका केल्याचे देखील नमूद केले.

गॉफ नेमकं काय म्हणाले होते?

प्रश्नोत्तराच्या सत्रादरम्यान ब्रिटनचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल आणि नेव्हिल चेंबरलेन यांचा उल्लेख करत गॉफ म्हणाले की, “मी म्यूनिक करारानंतर चर्चील यांनी दिलेले हाऊस ऑफ कॉमन्समधील १९३८ सालचे भाषण पुन्हा वाचत होतो आणि यामध्ये ते चेंबरलेन यांच्याकडे वळून ते म्हणतात, तुमच्याकडे युद्ध आणि अपमान यापैकी एक पर्याय होता. पण तुम्ही अपमान निवडला, तरीही तुम्हाला युद्धच मिळेल.”

यानंतर पुढे बोलताना गॉफ म्हणाले की, “राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ओव्हल कार्यालयात चर्चिल यांचा अर्धपुतळा पुन्हा बसवला आहे, पण तुम्हाला वाटते का की खरंच त्यांना इतिहास समजतो?.”

ओव्हल ऑफिसमध्ये युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात जोरदार चर्चा झाली होती. यानंतर ट्रम्प यांनी युक्रेनला दिली जाणारी लष्करी मदत रोखल्याच्या पार्श्वभूमीवर गॉफ यांनी हे विधान केले आहे. यामध्ये त्यांनी ट्रम्प यांची तुलना चर्चिल यांच्याशी केली होती, जे नेहमी म्यूनिक करारविरोधात बोलत आले होते. तसेच त्यांनी हा करार नाझी जर्मनीविरोधात आत्मसमर्पन असल्याचे त्यांचे म्हणणे होते.

दरम्यान न्यूझीलंडचे परराष्ट्र मंत्री विंस्टन पीटर्स यांनी लंडन येथील राजदूतांनी केलेले वक्तव्य खूपच निराशाजनक असल्याचे म्हटले आहे. ते न्यूझीलंडचे प्रतिनिधी म्हणून बोलत आहेत याची त्यांनी काळजी घेणे आवश्यक होते असेही ते म्हणाले. तसेच त्यांनी स्पष्ट केले ही त्यांचे विधान ही न्यूझीलंडची अधिकृत भूमिका नाही. तसेच न्यूझीलंडच्या माजी पंतप्रधान हेलेन क्लार्क यांनी गॉफ यांच्या पदावरून झालेल्या हकालपट्टीचा निषेध केला आहे. त्यांना पदावरून हटवण्यासाठी खूप कमकुवत कारण असल्याचे म्हटले आहे. क्लार्क या क्लार्क १९९९ ते २००८ पर्यंत न्यूझीलंडच्या पंतप्रधान होत्या.

Story img Loader