Crime News : मध्यप्रदेशामधील रतलाम जिल्ह्यातील सैलाना शहरात एका गर्भवती महिलेला सार्वजनिक आरोग्य केंद्रातून परत पाठवण्यात आले. यानंतर त्या महिलेच्या नवजात मुलाचा मृ्त्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यानंतर मध्य प्रदेशत्या आरोग्य अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
२३ आणि २४ मार्चच्या मध्यरात्री ही घटना घडली होती. या महिलेला तिचा पती तिसर्यांदा हातगाडीवरून रुग्णालयात घेऊन जात असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ मार्च रोजी जेव्हा कृष्णा ग्वाला हे त्यांच्य गर्भवती पत्नीला प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर सैलाना सार्वजनिक आरोग्य केंद्रात घेऊन गेले. ग्वाला यांनी आरोप केला की प्राथमिक तपासणीनंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी प्रसूतीला वेळ असल्याचे सांगून त्यांना घरी पाठवले. त्या दिवशी संध्याकाळी महिलेला जास्तच वेदना होऊ लागल्यानंतर ते पुन्हा पत्नीला घेऊन रुग्णालयात पोहचले, पण तिला दाखल करून न घेताच घरी पाठवण्यात आले. रात्री उशीरा प्रसूती वेदना वाढल्याने हातगाडीवरून पत्नीला रुग्णालयात घेऊन जावे लागले असे ग्वाला यांनी सांगितले.
“संध्याकाळी वेदना पुन्हा सुरू झाल्या, मी माझ्या पत्नीला पुन्हा रुग्णालयात घेऊन गेलो. पण दाखल करून घेण्याएवजी, तिला परत पाठवम्यात आलं. त्यानंतर जेव्हा रात्री उशीरा जेव्हा तिला प्रसूती वेदना होऊ लागल्या तेव्हा मी तिला हातगाडीवरून रुग्णालयात नेले. पण वाटेतच प्रसुती झाली आणि नवजात बाळाचा मृत्यू झाला,” असे ग्वाला यांनी सांगितले.
एसडीएम सैलाना मनीष जैन यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की या प्रकरणी चौकशी सुरू आहे. “पीडिताच्या कुटुंबियंनी केलेल्या आरोपांची आम्ही तपासणी करत आहोत. मुख्य वैद्यकीय अधिकारी आणि संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांचे जबाब धेतले हेत आणि चौकशीनंतर कारवाई केली जाईल,” असे जैन म्हणाले.
प्राथमिक माहितीनुसार, कुटुंबियांनी रुग्णवाहिकेची मागणी केली नाही किंवा रुग्णालयाला त्यांच्या अशी काही आवश्यकता असल्याबद्दल माहिती दिली नाही. त्यांचे कुटुंब आरोग्य केंद्रापासून जवळ होते, त्यामुळे त्यांनी चालत जाण्याचा निर्णय घेतला असेल असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी (सीएमएचओ) डॉ. एमएस सागर यांनी सांगितले की, घटनेची चौकशी करण्यासाठी एका वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याला पाठवण्यात आले होते, ज्यामध्ये दोन नर्सिंग अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा केल्याचे उघड झाले होते आणि त्यांना आता निलंबित करण्यात आले आहे. संबंधित कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.