नवजात बाळाला जिवंत जमिनीत गाडल्याचा धक्कादायक प्रकार गुजरातच्या पालनपूरमध्ये उघडकीस आला आहे. साबरकांठा जिल्ह्यातील गंभोई गावात हा गंभीर प्रकार घडला आहे. याप्रकरणी आरोपी आईवडिलांना पोलिसांनी अटक केली आहे. स्त्री जातीचे अर्भक असल्याने आरोपींनी हे कृत्य केल्याचे बोलले जात होते. मात्र, बाळ कमी वजनाचे आणि आजारी असल्यामुळे उपचारांचा खर्च परवडणार नाही, या चिंतेतून हे टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा आरोपींनी केला आहे.

करोनाचा धोका वाढला! केंद्रीय आरोग्य सचिवांचा सात राज्यांना सतर्कतेचा इशारा, महाराष्ट्रालाही खबरदारीच्या सुचना

शैलेश आणि मंजुळा बजानिया असे आरोपी आईवडिलांचे नाव आहे. गांधीनगरमध्ये शेतमजूर म्हणून काम करणारा शैलेश अनेक दिवसांपासून बेरोजगार होता. यामुळे हे दाम्पत्य गंभाईला मंजुळाच्या माहेरी राहत होते. दरम्यान, गुरुवारी सकाळी ६ वाजता मंजुळाने  बाळाला जन्म दिला. त्यानंतर या दाम्पत्याने हिम्मतनगर-शामलाजी रस्त्यावरील एका शेतात हे अर्भक जिवंत गाडले. शेतमजुराच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. यावेळी हे बाळ जिवंत असल्याचे आढळून आल्यानंतर तात्काळ वैद्यकीय सेवा पुरवण्यात आली. तपासणीनंतर बाळाची प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.

पुरुषी मानसिकतेचा कहर: महिलांनी जिंकली निवडणूक पण घरातल्या पुरुषांचा झाला शपथविधी

दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून आरोपी दाम्पत्याचा शोध घेण्यात आला. गंभोईतून गर्भवती महिलेसह तिचा पती बेपत्ता असल्याची माहिती उपनिरीक्षकांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे शैलेशला मेहसानाच्या काडीमधून तर मंजुळाला गांधीनगर जिल्ह्यातील मन्सामधून अटक करण्यात आली. या दाम्पत्यावर भारतीय दंड संहिता ३०७, ३१७ आणि ४४७ कलमांअतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या आठ महिन्यांमध्ये अर्भकांना जिवंत गाडण्याच्या गुजरातमध्ये आठ घटना उघडकीस आल्या आहेत. यातील ५ अर्भक स्त्री जातीचे होते. एकीकडे देशात ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा नारा दिला जात असताना दुसरीकडे मात्र बुरसटलेल्या मानसिककेतून स्त्रीभूणहत्येच्या घटना घडताना दिसत आहे.

Story img Loader