बंगळुरूमध्ये एक विचित्र प्रकार घडला आहे. ४४ वर्षीय गृहिणीने आपल्या शेजारी राहणाऱ्या नवविवाहित दाम्पत्याच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. हे दाम्पत्य बेडरूमची खिडकी उघडी ठेवून शरीरसंबंध ठेवतात, असा आरोप या महिलेने केला आहे. तसेच दाम्पत्याचे आवाज आणि त्यांचं खासगी संभाषण स्पष्ट ऐकू येत असल्यामुळे माझ्या घरातील वातावरण अस्वस्थ झाले असल्याचीही तक्रार महिलेने केली. महिलेने सांगितले की, मी त्यांना खिडकी बंद करण्यासाठी सांगितल्यानंतर त्यांनी मला विचित्र हावभाव करून दाखवले, असा आरोप महिलेने केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दक्षिण बंगळुरूच्या गिरीनगर परिसरात सदर घटना घडली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार या प्रकरणात सदर दाम्पत्यानेही महिलेविरोधात तक्रार दाखल केली आहे. घर मोकळं करावं, यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात असून त्यातूनच भलतेसलते आरोप केले जात आहेत, अशा आरोप भाडेकरूंनी केला. या प्रकरणाची वाच्यता सार्वजनिक झाल्यानंतर दोन्ही कुटुंबांनी गिरीनगर पोलिस ठाण्यात धाव घेत परस्पर सहमतीने त्यांना या प्रकरणात तोडगा काढायचा असल्याचे सांगितले.

गृहिणीने ८ मार्च रोजी शेजाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल केला होता. या तक्रारीत महिलेने म्हटले की, तिने ७ मार्च रोजी रात्री १०.३० वाजता आपल्या घराचा दरवाजा उघडला. तेव्हा तिने पाहिले की, भाडेकरूच्या घरातील दाम्पत्य शरीरसंबंध प्रस्थापित करत होते. यानंतर सदर महिलेने दाम्पत्याला आपल्या खोलीची खिडकी बंद करण्याची विनंती केली. मात्र दाम्पत्याने मला मारण्याची धमकी दिली, तसेच माझ्यावर बलात्कार करण्याचीही भाषा वापरली, अशी माहिती टाइम्स ऑफ इंडियाने दिली.

यानंतर भाडेकरू दाम्पत्यानेही सदर महिलेच्या विरोधात १० मार्च रोजी तक्रार दाखल केली. सदर महिला आणि तिचे कुटुंबिय जाणीवपूर्वक आम्हाला त्रास देत असून घर मोकळं करण्यासाठी दबाव टाकत असल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी भारतीय दंड विधान कायद्याअंतर्गत दोन्हीही बाजूंवर विविध कलम दाखल केले.