Vinesh Phogat पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताला चौथं पदक निश्चित झालंय असं वाटत असतानाच एक वाईट बातमी येऊन धडकली. कुस्तीत महिलांच्या ५० किलो वजनी गटात कुस्तीपटू विनेश फोगट (Vinesh Phogat ) हिला ऑलिम्पिक स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आले आहे. या मोठ्या निर्णयामागचे कारण म्हणजे ५० किलो वजनी गटाच्या सुवर्णपदकाच्या लढतीपूर्वी तिचे वजन वाढले होते. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार विनेशचे Vinesh Phogat वजन जास्त होते. त्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आले आहे, ज्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. कुस्तीपटूचे वजन मर्यादेपेक्षा अंदाजे १०० ग्रॅम जास्त आहे, ज्यामुळे तिला अपात्र ठरवले आहे. स्पर्धेच्या नियमांनुसार, विनेश रौप्य पदकासाठीही पात्र होणार नाही. ही बातमी समोर आल्यानंतर लोकसभेत राडा झाला आहे. लोकसभेत विरोधकांनी गदारोळ करत या प्रकरणी क्रीडा मंत्र्यांना उत्तर मागितलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा