अ‍ॅपलच्या आयपॅडला टक्कर देण्यासाठी गूगल नेक्ससचा नवा टॅब्लेट पुढच्या आठवड्यात अमेरिकेत सादर होतोय. गेल्यावर्षी जुलैमध्ये पहिल्यांदा गूगलने नेक्सस टॅब्लेट बाजारात आणला होता. याच टॅब्लेटमध्ये ग्राहकांच्या अपेक्षेनुसार सुधारणा करीत नवा टॅब्लेट बाजारात येणार आहे.
सॅन फ्रान्सिस्कोमध्ये येत्या २४ जुलै रोजी नव्या टॅब्लेटच्या अनावरणाचा कार्यक्रम होणार आहे. गूगलचे प्रमुख सुंदर पिचाई हे या कार्यक्रमाचे संचालन करणार आहेत. गूगलच्या अ‍ॅंड्राईड ऑपरेटिंग सिस्टिमचा वापर नेक्सस टॅब्लेटमध्ये करण्यात आला आहे. अ‍ॅड्राईडने अ‍ॅपलच्या आयओएसला भारतीय बाजारात जोरदार टक्कर दिली आहे. वेगवेगळ्या हॅण्डसेट निर्मिती कंपन्या त्यांच्या हॅण्डसेटमध्ये अ‍ॅड्राईड सिस्टिमचाच वापर करतात.
गूगलच्या नव्या नेक्सस टॅब्लेटमध्ये काय काय वैशिष्ट्ये असतील, याबद्दल तंत्रप्रेमींमध्ये सध्या उत्सुकता आहे.