Lawrence Bishnoi : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला पकडण्यासाठी १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलं आहे. बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात त्याचे नाव पुढे आल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. तसेच एनआयएने त्याच्या शोध सुरू केला आहे. महत्त्वाचे म्हणजे अनमोल बिष्णोईवर सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणातील आरोपींना शस्र पुरवल्याचा आरोपही आहे.

‘द इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या एप्रिल महिन्यात अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाळाच्या घटनेत अनमोलबिष्णोईचा समावेश होता. त्यावेळी फेसबुकवर पोस्ट करत त्याने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. तसेच पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणातील आरोपींना शस्त्रे पुरवल्याचा आरोपही त्याच्यावर करण्यात आला होता. याशिवाय अनमोल बिष्णोईवर खंडणीशी संबंधित १८ गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.

हेही वाचा – सासरच्या जाचाला कंटाळलेल्या जावयानं सुटकेसाठी थेट लॉरेन्स बिश्नोईचं घेतलं नाव; पोलीसही चक्रावले!

दरम्यान, आता बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात त्याचे नाव पुढे आल्यानंतर एनआयएने त्याचा शोध सुरु केला आहे. मात्र, २०२२ साली तो बनावट पासपोर्टच्या आधारे देश सोडून गेल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. अनमोलबिष्णोईबाबात नागरिकांना काही माहिती मिळाल्यास ती पोलिसांना द्यावी, असं आवाहन एनआयएकडून करण्यात आलं आहे. तसेच त्याची माहिती देणाऱ्यांना १० लाख रुपयांचे बक्षीसही एनआयएने जाहीर केलं आहे.

यासंदर्भाच ‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना, “आम्ही अनमोल बिष्णोईच्या आवाजाचे नमुने गोळा करण्याचा प्रयत्न करत आहोत. तांत्रिक पुरावे गोळा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पुढील प्रक्रिया केली जाईल” अशी प्रतिक्रिया एनआयएच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे.

हेही वाचा – Lawrence Bishnoi : “गुन्हेगार तो गुन्हेगारच, त्याच्यावर…”, हरियाणाच्या डीजीपींचा लॉरेन्स बिश्नोईवर कठोर कारवाईचा इशारा

गेल्या वर्षी केंद्रीय गृहमंत्रालयाने जाहीर केलेल्या कुख्यात गुंडांच्या यादीत त्याचा समावेश करण्यात आला होता. २०२३ मध्ये, एनआयएने लॉरेन्स बिष्णोई आणि अनमोल बिष्णोई यांच्यासह १४ जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. राजकीय नेते, चित्रपट अभिनेते आणि गायकांना धमकावत त्यांच्याकडे खंडणी मागितल्याचा आरोप १४ जणांवर करण्यात आला होता.