राष्ट्रीय तपास यंत्रणा(NIA)ने मोस्ट वाँटेड दहशतवादी, ज्याच्यावर तब्बल पाच लाख रुपयांचा इनाम होता आणि जो २०१९ पासून फरार होता तो कुलविंदरजीत सिंह उर्फ खानपुरियाच्या मुस्क्या आवळ्या आहेत. दिल्लीतील आयजीआय विमानतळावरूव त्याला अटक करण्यात यश आलं आहे.
खानपुरिया दहशतवादी संघटना बब्बर खालसा इंटरनॅशनल आणि खालिस्तान लिबरेशन फोर्स सारख्या दहशतवादी संघटनांशी जुडलेला होता.
१८ नोव्हेंबर रोजी खानपुरिया बँकॉकहून दिल्ली विमानतळावर आला होता, तेव्हा एनआयएने त्याला पकडले. या दहशतवाद्याचा पंजाबमध्ये टार्गेट किलिंगच्या कटांसह अनेक दहशतवादी कारवायांध्ये सहभाग होता. एवढच नाही तर ९० च्या दशकात दिल्लीतील कॅनॉटप्लेस येथे घडलेल्या बॉम्ब स्फोट आणि अन्य राज्यांधील ग्रेनेड हल्ल्यांच्या घटनांमध्येही तो सहभागी होता.