राष्ट्रीय तपास संस्थेने कतारमध्ये केरळमधील ७ ते ८ युवकांविरोधात दहशतवादी कृत्यात सहभागी असल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हे युवक तेथील आयसिसिशी संबंधित दोन दहशतवादी संघटनेत सहभागी झाले होते. तसेच अत्यंत धोकादायक दहशतवादी कृत्यात ते सहभागीही झाले होते, असे तपास यंत्रणेने म्हटले आहे. केरळमधील युवक मोठ्या संख्येने कतार आणि सीरियामध्ये जात असल्याची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेला सुमारे ६ वर्षांपूर्वी मिळाली होती. मात्र, पुरेसे पुरावे आणि माहिती नसल्यामुळे आतापर्यंत कारवाई करण्यात आली नव्हती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दहशतवादी संघटना झुंड अल-अक्सा आणि जभात अल-नुसराहला पाठिंबा देणाऱ्या या भारतीय युवकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ९ जानेवारी २०१९ला एनआयएने केरळमधील कोच्ची येथे एनआयएच्या कार्यालयात गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर त्यांच्यावर भारतीय दंडविधान कलम १६ आणि १८ अंतर्गत इतर युवकांना दहशतवादी कृत्यात सहभागी होण्यासाठी भडकवण्याचा आरोपही लावण्यात आला आहे.

एनआयएला २०१३ पासून याप्रकरणी माहिती मिळत होती. केरळ आणि कर्नाटक येथील युवक जे कतारमध्ये जात. ते तिथे सीरियाविरोधात युद्धात सहभागी झाल्याचे दिसून आले होते. हे युवक पूर्ण तयारीने दहशतवादी संघटनेत सहभागी झाले होते. या सर्व युवक झुंड अल-अक्सा आणि जभात अल-नुसराह सारख्या दहशतवादी संघटनेत सहभागी झाले होते.