नवी दिल्ली : बंदी घातलेली दहशतवादी संघटना ‘जैश-ए-मोहम्मद’चा म्होरक्या मौलाना मसूद अझहर अल्वीचा उजवा हात मानल्या जाणाऱ्या मोहम्मद दिलावर इक्बाल आणि कुपवाडा येथील रहिवासी मोहम्मद उबेद मलिक यांच्याविरुद्ध राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आरोपपत्र दाखल केले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांवर हल्ला करून शांतता-सलोखा बिघडविल्याचा त्यांच्यावर आरोप असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मोहम्मद दिलावर इक्बाल पाकव्याप्त काश्मीरमधील अब्बासपूरचा रहिवासी आहे. त्याला माझ खान काश्मिरी आणि आझाद काश्मिरी आदी अनेक टोपणनावेही आहेत.

हेही वाचा >>> मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये उद्या मतदान; प्रचार थंडावला

himachal pradesh assembly passes new bill
पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत अपात्र ठरलेल्या आमदारांना पेन्शन न देण्याचे विधेयक हिमाचल प्रदेशात मंजूर
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
women raped in indore
Raped In Indore: महिलेला विवस्त्र करत मारहाण आणि बलात्कार, नृत्य करण्यास भाग पाडले; आरोपी भाजपाशी संबंधित असल्याची काँग्रेसची टीका
west Bengal rapist death penalty marathi news
बलात्काऱ्यांना फाशीच्या शिक्षेची तरतूद – ममता बॅनर्जी; ‘लवकरच कायद्यात सुधारणा’
namibia will cull elephant
Drought In Namibia : दुष्काळग्रस्तांना अन्न पुरवण्यासाठी ‘हा’ देश करणार ८३ हत्तींची हत्या; सरकारने काढले आदेश!
Sukoon Scheme in Family Courts to settle pending cases of family disputes Pune news
कौटुंबिक न्यायालायात ‘सुकून’ योजना; कौटुंबिक वादाची प्रलंबित प्रकरणे मिटवण्यासाठी प्रयत्न
PM Modi participate in Lakhpati Didi Sammelan at Jalgaon
मुख्यमंत्र्यांच्या मागण्यांकडे पंतप्रधानांचे दुर्लक्ष; शेतकऱ्यांविषयी प्रश्नांबाबत भाषणात अवाक्षरही नाही
missing women, High Court, State Govt,
बेपत्ता महिलांचा शोध घेण्यासाठी ठोस यंत्रणा आहे का ? उच्च न्यायालयाची राज्य सरकार, पोलिसांना विचारणा

जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशात तरुणांना दहशतवादी कृत्ये करण्यास प्रवृत्त करण्यासाठी चिथावणीखोर प्रक्षोभक भाषणे दिली होती.‘एनआयए’ने जम्मूमधील विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात नमूद केले, की दिलावर इक्बाल मसूद अझहरचा निकटचा साथीदार असून त्याने उबेद मलिकला ‘जैश’मध्ये सामील होण्यासाठी चिथावणी दिली होती. ‘एनआयए’च्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार दिलावर चिथावणीखोर ध्वनिफिती आणि ध्वनिचित्रफितींसह मसूद अझहरची छायाचित्रे प्रसृत करत असे. या ध्वनिचित्रफितींत अझहर कट्टर मूलतत्त्ववादी इस्लामचा प्रचार करताना दाखवून अतिरेकी पार्श्वभूमीच्या तरुणांना आत्मघाती कृत्ये करण्यासाठी फूस लावत असे. ‘एनआयए’ २१ जून २०२२ पासून या कट प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.