देशात दहशतवादी हल्ले घडविण्याचा कट आखल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) इंडियन मुजाहिदीनचा सहसंस्थापक यासिन भटकळ आणि त्याचा निकटचा साथीदार असद उल्ला अख्तर या दोघांविरोधात गुरुवारी दुसरे आरोपपत्र दाखल केले.
न्या. आय. एस. मेहता यांच्या जिल्हा न्यायालयात या संबंधातील हे पूरक आरोपपत्र दाखल केले गेले. या प्रकरणी २४ फेब्रुवारीला सुनावणी आहे.
राष्ट्रीय तपास संस्थेने म्हटले आहे की, भटकळ याने आपल्या अन्य साथीदारांसह देशाच्या अनेक भागांत छुपे गट आणि घातपाती गट स्थापन केले होते. यातील काही गट दिल्ली, बिहारमधील दरभंगा, महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि नांदेड तसेच कर्नाटकातील भटकळ आणि हैदराबाद येथे कार्यरत होते.भटकळ आणि अख्तर याला गेल्या वर्षी २८ ऑगस्टला भारत-नेपाळ सीमेवर अटक झाली होती.

Story img Loader