राष्ट्रीय तपास संस्थेने(एनआयए) भाजपा युवा मोर्चाचे सदस्य प्रवीण नेत्तरू हत्येप्रकरणी प्रतिबंधित संघटना ‘पीएफआय’च्या चार सदस्यांची माहिती देणाऱ्यांना रोख बक्षीस जाहीर केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यामध्ये मोहम्मद मुस्तफा आणि थुफैल एम एच या दोघांवर प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे आणि उमर फारुख एमआर आणि अबुबकर सिद्दिक यांच्यावर प्रत्येकी दोन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. एनआयकडून या चौघांच्या फोटोंसह त्यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

नक्की पाहा – PHOTOS : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बळीराजाच्या भूमिकेत; गावाकडील शेतात रमले

भाजपा युवा मोर्चाचे सदस्य प्रवीण नेत्तरू यांच्या हत्येनंतर कर्नाटक राज्यात सध्या तणावपूर्ण वातावरण आहे. राज्यातील सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन येथील मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित केलेल्या सर्व कार्यक्रमांना रद्द केले आहेत. असे असताना कर्नाटक पोलिसांनी या प्रकरणात दोघांना अटक केली आहे. शफिक बलेरे आणि झाकीर सावनुरू असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दरम्यान, पोलिसांच्या या कारवाईनंतर मुस्लीम असल्यामुळेच आम्हाला लक्ष्य केलं जातंय, असा आरोप शफिकच्या वडिलांनी केला होता.

नेमकं काय घडलं होतं?

जिल्हा भाजपा युवा मोर्चा समितीचे सदस्य प्रवीण नेत्तर यांची जुलै महिन्यात बेल्लारे येथील त्यांच्या ब्रॉयलर दुकानासमोर रात्री दुचाकीवरून आलेल्या तीन जणांनी वार करून हत्या केली होती. ते दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बेल्लारे येथील नेट्टारूचे रहिवासी होते. या हत्येनंतर दक्षिण कन्नड जिल्ह्यात अनेक ठिकाणी तणाव निर्माण झाला होता. आंदोलकांनी दगडफेक केली आणि पोलिसांनी लाठीमार केल्याच्या घटना घडल्या. हिंदू कार्यकर्त्यांच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत नसल्याचा आरोप करत भाजपा आणि संघ परिवाराच्या समर्थकांनी राज्य सरकारविरोधात संताप व्यक्त केला होता.

मुंबई : दादरच्या छबीलदास शाळेत एकापाठोपाठ चार सिलिंडरचा स्फोट; जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

तर या घटनेनंतर बसवराज बोम्मई यांनी रात्री त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी त्यांनी राष्ट्रविरोधी आणि दहशतवादी कृत्य करणाऱ्या शक्तींचा नायनाट करण्यासाठी राज्यात विशेष प्रशिक्षित कमांडो फोर्स उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे,असे सांगितले होते. तसेच प्रवीण यांच्या हत्येनंतर आमच्या मनात संताप आहे. शिवमोग्गा येथे बजरंग दलाचा कार्यकर्ता हर्षाच्या हत्येनंतर काही महिन्यांत घडलेल्या या धक्कादायक घटनेने मला दुःख झाल आहे, असे त्यांनी म्हटले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nia has announced a cash reward for information about four banned pfi members wanted in praveen nettaru murder case msr