राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएने आज (१८ सप्टेंबर) आंध्र प्रदेशमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केली. या कारवाईत एनआयएच्या अधिकाऱ्यांनी हिंसा भडकवणे तसेच बेकायदेशीर कृत्यांच्या आरोपाखाली पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) सदस्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. एनआयए
ने आंध्र प्रदेशप्रमाणेच तेलंगाणा राज्यातील निझामाबाद जिल्ह्यातही कारवाई केली आहे.

हेही वाचा >>> पंजाब : चंदीगड विद्यापीठातील विद्यार्थिनींचे खासगी व्हिडीओ लीक, खळबळजनक घटनेनंतर विद्यार्थिनी आक्रमक

मिलालेल्या माहितीनुसार एनआयएच्या २३ एकूण पथकांनी आंध्र प्रदेश आणि तेलंगाणामधील काही जिल्ह्यांत छापेमारी केली आहे. यामध्ये बेकायदेशीर कृत्य, हिंसा भडकावणे तसेच दहशतवादी कृत्यांशी संबंधित आरोपांच्या चौकशीसाठी पीएफआयच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. निझामाबाद, कुरनूल, गुंटूर आणि नेल्लोर जिल्ह्यात ही कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> चीनकडून पुन्हा दहशतवाद्यांची पाठराखण, मुंबई हल्ल्याचा सुत्रधार साजिद मीरला काळ्या यादीत टाकण्यास दर्शवला विरोध

याआधी एनआयएने पीएफआयचे जिल्हा निमंत्रक शादुल्लाह आणि सदस्य मोहम्मद इम्रान, मोहम्मद अब्दुल मोबीन यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलेले आहे. कराटे शिकवण्याच्या नावाखाली हिंसा भडकावणे तसेच बेकायदेशीर कृत्य करण्याच्या आरोपांखाली त्यांची चौकशी केली जात आहे. दुसरीकडे नंदयाल आणि कर्नूल या भागात एनआयए आपली कारवाई करत असताना स्थानिकांनी विरोध केला. स्थानिकांनी एनआयएविरोधात घोषणाबाजी केली.

Story img Loader