वेनेझुएलात पार पडलेल्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत निकोलस मादूरो यांचा विजय झाला आहे. ह्य़ुगो चावेझ यांनी निकोलस यांना आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले होते. विरोधी पक्षाचे उमेदवार हेन्री कॅप्रिलेस यांचा तीन लाख मतांनी पराभव केला.
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत मादूरो यांना ५०.६६ टक्के, तर कॅप्रिलेस यांना ४९.१ टक्के इतकी मते पडल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले. निवडणुकीच्या निकालानंतर मादूरोच्या समर्थकांनी मोठय़ा प्रमाणात आनंदोत्सव साजरा केला, तर कॅप्रिलेस यांच्या गोटात निराशेचे वातावरण पसरले. ह्य़ुगो चावेझ यांनी मादूरो यांना आपला उत्तराधिकारी निवडल्यामुळे ते हंगामी राष्ट्रपती म्हणून काम पाहत होते.
मादूरो यांच्या समर्थकांनी मतदारांवर मादूरोंना मतदान करण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तसेच कॅप्रिलेस यांनी पुन्हा मतमोजणीची मागणी केली आहे. मादूरो यांच्या समर्थकांनी मात्र त्यास विरोध दर्शवला आहे.

Story img Loader