नायजेरीयातील कानो शहरातील एका मशिदीवर शुक्रवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १२० नागरीक ठार झाले असून, २७० जण जखमी झाले आहेत.
शुक्रवारच्या नमाज पठणासाठी नागरीक मोठया संख्येने मशिदीत एकत्र जमले असताना, दोन आत्मघातकी दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोटामध्ये स्वत:ला उडवून घेतले त्याचवेळी तिथे आलेल्या अन्य दहशतवाद्यांनी नागरिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात १२० नागरिकांचा मृत्यू झाला, तर २७० नागरिक जखमी झाले. कानो शहरातील अमीर मुहम्मद सानूसी यांच्या राजवाडयाजवळील मशिदीत हा बॉम्बस्फोट झाला.

Story img Loader